सरकार बहादुरांच्या मनात आलं आणि त्यांनी त्यांचं नाव ठेवलं, अन्नदाता. आणि आता या नावाच्या चौकटीतून बाहेरच येता येईना. सरकार बहादुर सांगणार, ‘पेरा’ मग हा पेरणार. सरकार बहादुर सांगणार, ‘खतं द्या’ की हा बापडा खत देणार. माल आला की सरकार बहादुर ठरवतील त्या भावाला हा आपला माल विकणार. आपली धरती कशी सुजला सुफला आहे याचा दिंडोरा सरकार बहादुर जगभर पिटणार आणि अन्नदाता मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी बाजारातून आपणच पिकवलेलं धान्य कसंबसं विकत घेणार. वर्षभर हे असंच चालणार, त्यात काडीचाही बदल नाही. आणि अचानक एक दिवस त्याच्या लक्षात येतं की त्याचा पाय कर्जात खोल रुतलाय. त्याच्या पायाखालची जमीनच खचली आणि त्याच्या भोवतीचा पिंजरा अधिकच मोठा व्हायला लागला. त्याला वाटत होतं की या कारावासातून तो सुटू शकेल. पण त्याचा आत्मासुद्धा सरकार बहादुरचा गुलाम झाला होता. आणि त्याचा स्वाभिमान किसान सम्मान निधीच्या खैरातीत कधीचा दबून, विरून गेला होता.

देवेशच्या आवाजात हिंदी कविता ऐका

प्रतिष्ठा पांड्याच्या आवाजात कवितेचा इंग्रजी अनुवाद ऐका


मौत के बाद उन्हें कौन गिनता

ख़ुद के खेत में
ख़ुद का आलू
फिर भी सोचूं
क्या मैं खालूं

कौन सुनेगा
किसे मना लूं
फ़सल के बदले
नकदी पा लूं

अपने मन की
किसे बता लूं
अपना रोना
किधर को गा लूं

ज़मीन पट्टे पर थी
हज़ारों ख़र्च किए थे बीज पर
खाद जब मिला
बुआई का टाइम निकल गया था
लेकिन, खेती की.
खेती की और फ़सल काटी
फ़सल के बदले मिला चेक इतना हल्का था
कि साहूकार ने भरे बाज़ार गिरेबान थाम लिया.

इस गुंडई को रोकने
कोई बुलडोज़र नहीं आया
रपट में पुलिस ने आत्महत्या का कारण
बीवी से झगड़े को बताया.

उसका होना
खेतों में निराई का होना था
उसका होना
बैलों सी जुताई का होना था
उसके होने से
मिट्टी में बीज फूटते थे
कर्जे की रोटी में बच्चे पलते थे
उसका होना
खेतों में मेड़ का होना था
शहराती दुनिया में पेड़ का होना था

पर जब उसकी बारी आई
हैसियत इतनी नहीं थी
कि किसान कही जाती.

जिनकी गिनती न रैलियों में थी
न मुफ़्त की थैलियों में
न होर्डिंगों में
न बिल्डिंगों में
न विज्ञापनों के ठेलों में
न मॉल में लगी सेलों में
न संसद की सीढ़ियों पर
न गाड़ियों में
न काग़ज़ी पेड़ों में
न रुपए के ढेरों में
न आसमान के तारों में
न साहेब के कुमारों में

मौत के बाद
उन्हें कौन गिनता

हे नाथ!
श्लोक पढूं या निर्गुण सुनाऊं
सुंदरकांड का पाठ करूं
तुलसी की चौपाई गाऊं
या फिर मैं हठ योग करूं
गोरख के दर पर खिचड़ी चढ़ाऊं
हिन्दी बोलूं या भोजपुरी
कैसे कहूं
जो आपको सुनाई दे महाराज…

मैं इसी सूबे का किसान हूं
जिसके आप महंत हैं
और मेरे बाप ने फांसी लगाकर जान दे दी है.

मरणानंतर त्यांना गणतं कोण?

आपल्याच शेतात
माळवं माय
तरी पण वाटे
खाऊ काय

सांगू कोणा
विनवू कोणा
पिकाच्या बदल्यात
पैसा आणा

मनातलं माझ्या
सांगू कुणाकडे?
रडणं माझं
गाऊ कुणापुढे?

खंडाची जमीन
बियाण्यावर गेले हजार
खत मिळेपर्यंत
पेरणी उलटून गेली, झालो बेजार

तरी केली शेती.
राबराबलो, पीक आलं हाती.
त्याच पिकाची पट्टी इतकी कमी
गचांडी धरायला सावकाराने केलं नाही कमी

ही मग्रुरी थांबवायला
कुठलाच बुलडोझर नाही आला
अहवालात पोलिसांनी लिहिलं
बायकोशी भांडला आणि जीव दिला.

तिचं असणं
शेतात खुरपणी होणं
तिचं असणं
नांगराला बैल जुंपणं
ती होती
म्हणून मातीतून अंकुरत होतं बी
उसन्या पैशाची भाकर खाऊन मोठी होत होती मुलं-बाळं
ती म्हणजे शेतातल्या सरी आणि ताली
शहरी जगात झाडाची थंडगार सावली

तिची वेळ आली
तेव्हा नव्हतीच इतकी पत
की म्हणेल तिला कुणी शेतकरी.

तिची गणती कशातच नाही
ना मोर्चात
ना फलकांवर
ना इमारतींमध्ये
ना जाहिरातींच्या जंजाळात
ना सेलच्या बाजारात
संसदेच्या पायऱ्यांवर ती नाही
ना गाडीत
ना पैशाच्या लडीत
ना नाण्यांच्या खणखणाटात
ना ताऱ्यांच्या लखलखाटात
नव्हतीच ती साहेबांच्या कुलदीपकांत

मेल्यानंतर
त्यांना गणतंच कोण?

महाराज!
श्लोक म्हणू का निर्गुणी भजन
सुंदरकांडातला एखादा अध्याय
का तुलसीदासाची चौपाई वाचू?
हठयोगाची साधना करू?
का गोरखनाथाच्या द्वारी खिचडीचा प्रसाद चढवू?
हिंदीत बोलू का भोजपुरीत?
कसं सांगू महाराज
म्हणजे तुम्हाला ऐकू येईल...

मी त्याच सुभ्यातला शेतकरी आहे
ज्याचे आहात तुम्ही महंत
आणि माझ्या बापाने फाशी घेऊन जीव दिलाय.

कवितेचा इंग्रजी अनुवादः प्रतिष्ठा पांड्या

Poem and Text : Devesh

Devesh is a poet, journalist, filmmaker and translator. He is the Translations Editor, Hindi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Devesh
Editor : Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a poet and a translator who works across Gujarati and English. She also writes and translates for PARI.

Other stories by Pratishtha Pandya
Illustration : Shreya Katyayini

Shreya Katyayini is a Video Coordinator at the People's Archive of Rural India, and a photographer and filmmaker. She completed a master's degree in Media and Cultural Studies from the Tata Institute of Social Sciences, Mumbai, in early 2016.

Other stories by Shreya Katyayini