मुंबई, 23 नोव्हेंबर 2021 (GPN): टीव्हीएस युरोग्रिप, हा भारतातील टू आणि थ्री व्हीलरकरिताचा एक प्रसिद्ध असा ब्रॅन्ड आहे, त्यांनी चार-वेळेला आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रमुख प्रायोजक म्हणून हातमिळवणी केली असून, ते पुढील तीन वर्षांकरिता (2022-2024) या संघाचे अधिकृत भागीदार असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि टीव्हीएस युरोग्रिपद्वारे आपल्या विविध श्रेणींचे कल्पक असे उपक्रम राबविले जातील ज्यामुळे देशभरातील सीएसकेच्या चाहत्यांना त्याबद्दलची माहिती मिळू शकेल. या भागीदारीमुळे टीव्हीएस युरोग्रिपला चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या रंगाच्या जर्सीवरती समोरच्या बाजूला झळकता येणार आहे. संपूर्ण आयपीएल संघामध्ये सीएसके चे चाहते हे सर्वाधिक असून ते या संघाशी जोडले गेले आहेत.
टीव्हीएस, श्रीचक्रा लिमिटेडचे विक्री आणि विपणन – ईव्हीपी असलेले श्री. पी. माधवन यावेळी बोलताना म्हणाले, “ टीव्हीएस युरोग्रिपला चेन्नई सुपर किंग्जसह एकत्रित येऊन अतीशय आनंद होतो आहे. जर्सीच्या ब्रॅन्डिंग आणि प्रायोजकतेमुळे युरोग्रिप या ब्रॅन्डचे नाव आणि नजरेत भरणारी ओळख ही चाहात्यांमध्ये अधिक जागृत होणार आहे. आम्हाला एकत्रित येऊन व्यवसायाचा अनुभव आणि ग्राहकांशी जोडली जाणारी मने या दोन्हीचा अनुभव घेता येणार आहे. आम्हाला दोन्ही ब्रॅन्ड्समध्ये समन्वय दिसून येत असून, अशी खात्री आहे की या भागीदारीमुळे सीएसके आणि टीव्हीएस युरोग्रिप दोन्हीला फ़ायदा होणार आहे.”

Mr. P. Madhavan, EVP – Sales & Marketing, TVS Srichakra Limited with Mr. KS Viswanathan, CEO, Chennai Super Kings Cricket Limited
विकासाबाबत बोलताना, चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड चे सी.ई.ओ, श्री. केएस विश्वनाथन म्हणाले, “ टीव्हीएस युरोग्रिप आमचा प्रमुख प्रायोजक झाल्याचा आम्हाला अतीशय आनंद झालेला असून आम्ही त्यांचे चेन्नई सुपर किंग्जच्या कुटुंबामध्ये स्वागत करतो आहोत. हा काळ(पुढील तीन वर्ष) आमच्याकरता फ़ारच उत्साहाचा असणार आहे. आमचा असा विश्वास आहे की या भागीदारीमुळे आम्ही आमच्या चाहत्यांशी दीर्घकाळ घट्ट असे नाते, निर्माण करू आणि दूर पर्यंत आमच्या पिवळ्यारंगाच्या छटा उमटवू.”
For more information, visit https://www.tvseurogrip.com/
Be the first to comment on "टीव्हीएस युरोग्रिप आता चेन्नई सुपर किंग्जचे प्रमुख प्रायोजक आयपीएलच्या 2022 पासून तीन वर्षांकरिताचा भागीदारी करारावर स्वाक्षरी"