Global Prime News The Power of Journalism at a Clic

घराचा विमा सर्वांसाठी अत्यावश्यक का आहे हया बद्धल सांगितले आहे एसबीआय जनरल इन्श्युरन्सचे तुषार धिमर,नॅशनल हेड रिटेल अंडररायटिंग

घरासारखी दुसरी कोणतीही जागा नाही. त्यामुळे घर घेणे ही सर्वात मोठी आणि भावनिक गुंतवणूक असते. घर ही आपली एक सुरक्षित जागा असते आणि आपल्या आयुष्यातील काही सर्वोत्तम क्षण याच घरातील असतात. तथापि, घराचा विमा घेण्याविषयी मात्र क्वचितच विचार करण्यात येतो.

कोव्हिड-१९च्या समस्येमुळे २०२० हे वर्ष अत्यंत अनपेक्षित होते. या आजाराचा जगातील लाखो आयुष्यांवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे घराचा विमा अत्यंत गरजेचा आहे, याचीही प्रकर्षाने जाणीव झाली. परिणामी, एकूणच विम्याच्या बाबतीत ग्राहकांच्या दृष्टिकोनामध्ये अमूलाग्र बदल दिसून आला. एके काळी विमा घेणे हा काहीसा ऐच्छिक पर्याय होता, पण आता अकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फायनान्शिअल पोर्टफोलियोमध्ये विमा समाविष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे.

सक्रीयता आवश्यक

२०२१ सुरू झाल्या झाल्या उत्तराखंडमध्ये हिमप्रपात आला आणि भारतातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण खूपच वाढू लागले आहे. अशा आपत्तीमुळे मालमत्तेचे अपरिमित नुकसान होत आहे, त्यामुळे घराचा विमा घेण्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही आणि त्यावर सक्रियपणे विचार केला गेला पाहिजे.

तुमच्या घराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी गृह विमा पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. तीन प्रकारची गृह विमा उत्पादने तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. केवळ बांधकाम समाविष्ट असलेले उत्पादन, कंटेन्ट उत्पादन आणि बांधकाम अधिक कंटेन्ट उत्पादन.

एसबीआय जनरल इन्श्युरन्सचेतुषार धिमर-नॅशनल हेड रिटेल अंडररायटिंग यांच्या मते  स्ट्रक्चर ओन्ली किंवा केवळ बांधकाम उत्पादनाच्या माध्यमातून घराचा मालक घराच्या संपूर्ण बांधकामाचे संरक्षण करण्याची निवड करू शकतो. असे केल्यास पूर, भूकंप किंवा अशा प्रकारच्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे भिंती पडल्या किंवा इतर भागांची हानी झाली तर तर घराचा मालक नुकसानभरपाईसाठी दावा करू शकतो. या उत्पादनाच्या अजून एका व्हिरिअंटमध्ये फक्त वस्तूंना संरक्षण देण्यात येते. घरमालक घरातील गृहोपयोगी वस्तूंचा म्हणजेच फ्रिज, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही आणि लॅपटॉप किंवा दागिन्यांसारख्या वस्तूंचा विमा उतरवतो. तिसऱ्या प्रकारामध्ये म्हणजेच बांधकाम आणि वस्तू किंवा सर्व-जोखीमांचा समावेश करून घेणाऱ्या उत्पादनात बांधकाम आणि वस्तू या दोहोंनाही संरक्षण मिळते. गृहविमा केवळ घरमालकांसाठीच आहे हा एक गैरसमज आहे. भाडेकरूंसाठीही गृहविमा तितकाच गरजेचा आहे. विशेषतः तुम्ही वारंवार कुलुप किल्लीच्या भरोशावर घराबाहेर जात असाल तर हे उत्पादन अधिकच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत कंटेन्ट कव्हर हे सर्वोत्तम असते. गृहोपयोगी वस्तू, उपकरणे किंवा दागिन्यांचे नुकसान झाल्यास तुम्ही नुकसान भरपाईचा दावा करू शकत असल्यामुळे हे विमा संरक्षण अत्यंत संबंधित आहेत.

यासाठी मूल्यांकन कशा प्रकारे करतात

विम्याची रक्कम ही बांधकामाच्या बाबतीत विम्याची रक्कम गुणिले बांधकामाचा वाजवी खर्च एवढी निश्चित केली जाते तर कंटेन्ट्साठी त्या उत्पादनाचे सध्याची बाजारातील किंमत वजा घसारा (डेप्रिसिएशन) मूल्य (वार्षिक १०%) लागू होतो. दागिन्यांच्या बाबतीत सरकारी मान्यताप्राप्त ज्वेलरचा मूल्यांकन अहवाल वैध मानला जातो.

गृहविम्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी ग्राहक त्याच्या उत्पादनामध्ये अनेक प्रकारचे अॅड-ऑन करण्याचाही विचार करू शकतात. यात सार्वजनिक दायित्व (यात प्रॉपर्टीचे नुकसान होताना घराबाहेरील व्यक्तींना इजा झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करता येतो.), महत्त्वाची रिप्लेसमेंट आणि पॉलिसीधारक, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा अशा उत्पादनांचा समावेश आहे. 

याचा सारांश म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांनी गृहविम्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वर नमूद केलेली उत्पादने आता उपलब्ध असली तरी ज्याप्रमाणे २०२० साली आरोग्य विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी भारतातील विमा नियंत्रकांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, त्याचप्रमाणे गृह विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठीही ती जारी केली केली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "घराचा विमा सर्वांसाठी अत्यावश्यक का आहे हया बद्धल सांगितले आहे एसबीआय जनरल इन्श्युरन्सचे तुषार धिमर,नॅशनल हेड रिटेल अंडररायटिंग"

Leave a comment

Your email address will not be published.


*