बोगस कामगारांची ‘माथाडी’त नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
05.51 AM

पुणे - पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या (माथाडी मंडळ) अधिकाऱ्यांना गाडीतून घेऊन जाऊन बोगस कामगारांची नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामगारमंत्र्यांच्या जवळीक असलेल्या एका कार्यकर्त्यानेच हा प्रकार केल्याची चर्चा बाजार आवारात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुणे - पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या (माथाडी मंडळ) अधिकाऱ्यांना गाडीतून घेऊन जाऊन बोगस कामगारांची नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामगारमंत्र्यांच्या जवळीक असलेल्या एका कार्यकर्त्यानेच हा प्रकार केल्याची चर्चा बाजार आवारात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पुणे जिल्ह्यातील कंपन्या आणि बाजार आवारातील कामगारांची नोंदणी माथाडी मंडळाकडे करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित मालकाने आपल्याकडे असलेल्या कामगारांची माहिती माथाडी मंडळाला लेखी पत्राद्वारे द्यावी लागते. त्यानंतर मंडळाचे अधिकारी संबंधित कंपनी अथवा बाजार आवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. त्यानंतर त्यांच्याकडील कामगारांची नोंदणी मंडळाकडे केली जाते. कामगाराची नोंदणी झाल्यानंतर मालक दरमहा कामगारांचा पगार या मंडळाकडे जमा करतात. मंडळ कामगारांना पगार देते.

याशिवाय अन्य फायदेही मंडळाच्या माध्यमातून कामगारांना दिले जातात; परंतु गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील काही मंडळी आपल्या परिसरातील कंपन्यांवर दबाव आणून जादा कामगार असल्याची नोंदणी मंडळाकडे करून घेतात. त्या पोटी मिळालेला पगार ते स्वत: लाटतात. असे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

डॉ. आढाव यांचे मंडळाला पत्र
बोगस कामगारांबाबतचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बाजार आवारात त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली. याबाबत कामगार नेते 
डॉ. बाबा आढाव यांनीही माथाडी मंडळाला पत्र देऊन संबंधित प्रकाराची चौकशी करावी आणि बोगस कामगारांची नोंद झाली असेल तर ती रद्द करावी, अशी मागणी केल्याचे समजते. त्यावर आता माथाडी मंडळ काय भूमिका घेते?  याकडे लक्ष लागले आहे.

विद्यार्थी सांगतात...
पाहू तरी शरीरात काय आहे?, असा धडा आम्हाला होता. पाठ्यपुस्तकात हा धडा खूप वेळा वाचला तरी काही कळत नव्हते; परंतु शिक्षिकेने ‘डिजिटल बोर्ड’च्या साहाय्याने धडा समजावून सांगितला, तेव्हा मला तो धडा समजला.
- गाथा राऊत

परिसर विषयामध्ये ‘प्राण्यांचा जीवनक्रम’ धडा मला काही केल्या कळत नव्हता; परंतु शिक्षिकेने कोशातून रंगीबेरंगी फुलपाखरू कसे बाहेर येते, याचा व्हिडिओ ‘ई-बोर्ड’वर दाखविला आणि मला त्यात रस वाटू लागला. मग मी पक्षी, प्राणी, निसर्गातील विषयांमध्ये रमत गेले आणि त्याची अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले.
- रिद्धी मांढरे

मांजर शिकार कशी करते, हे ‘ई-बोर्ड’वर पाहिले. त्यातून प्राण्यांचे जीवनक्रम, जीवनचक्र उलगडत गेले. अवघड गणितही स्क्रिनच्या साहाय्याने एकदम सोपी होऊन जातात.
- ईशान अग्निहोत्री

घड्याळात बारापर्यंत आकडे असतात, तरी ते चोवीस तासांचे घड्याळ कसे असते बरे, हे मला कळत नव्हते; परंतु ‘डिजिटल बोर्ड’वर त्या संदर्भात क्‍लिप दाखविल्यानंतर मला घड्याळ पूर्णपणे समजले.
- प्रद्योत खरे

Web Title: pune news bogus worker mathadi registration