इचलकरंजी - कुमारी माता व विधवांच्या अर्भकांना बेकायदा विक्री केल्या प्रकरणातील डॉ. अरुण पाटील याचा मुलगा डॉ. हृषीकेश याने शहरातून पलायन केले आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या चौघांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने चौघांना पुन्हा तिसऱ्यांदा पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणी याच हॉस्पिटलमधून कुमारी मातेच्या चार दिवसांच्या अर्भकाची विक्री करतानाचा फोटो केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याकडे पाठविला होता. यात डॉ. पाटील, त्याची पत्नी उज्ज्वला व अर्भक विकत घेतलेले व सध्या कोठडीत असलेले अभियंता अनिल दशरथ चहांदे, त्यांची अभियंता पत्नी प्रेरणा चहांदे, संबंधित अल्पवयीन कुमारी माता आणि अन्य व्यक्ती असे सहा जण दिसत आहेत.
हा संबंधित फोटो पोलिसांनी न्यायालयासमोर आणला. पोलिसांनी फोटोतील डॉ. पाटील, त्याची पत्नी उज्ज्वला व अर्भक विकत घेतलेले अनिल चहांदे, त्याची पत्नी प्रेरणा यांना अटक केली आहे. संबंधित अल्पवयीन कुमारी मातेला ताब्यात घेऊन तिची याप्रकरणी कसून चौकशी करून, तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. फोटोत दिसणाऱ्या सहाव्या व्यक्तीचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.
संबंधीत बातम्या