ज्वारीला रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला
मंगळवेढा : जिल्ह्यात ज्वारीच्या कोठार असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवारात यंदाच्या रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असल्याने ज्वारीच्या उत्पादनात चाळीस टक्याहून अधिक घट होत असल्याने या पिकासाठी जिरायत शेतकऱ्यांचा लागवडी इतकाही खर्च देखील निघाला नाही.
मंगळवेढा : जिल्ह्यात ज्वारीच्या कोठार असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवारात यंदाच्या रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असल्याने ज्वारीच्या उत्पादनात चाळीस टक्याहून अधिक घट होत असल्याने या पिकासाठी जिरायत शेतकऱ्यांचा लागवडी इतकाही खर्च देखील निघाला नाही.
तालुक्यात चार साखर कारखाने असले तरी गाळपास येणारा ऊस हा अन्य तालुक्यातील असूनही शासन दरबारी मात्र साखर उत्पादकांना तालुका अशी ओळख निर्माण होत आहे. तालुक्यात ज्वारीच्या पीकाचे 45 हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. पण यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली. कृषी खात्याने या पिकासाठी बियाणाचे वाटप देखील केले. मंगळवेढ्याचा पिकेल एक कोण खाईल ढोई जण अशी म्हण प्रचलित आहे पण ही म्हण मात्र यंदाच्या हंगामात लागू होणार नाही.
मंगळवेढा व मुंढेवाडी, बोराळे, ब्रम्हपुरी, कारखाना साईट या शिवारातील जमीन ज्वारीच्या पिकाला पोषक असल्यामुळे या परिसरात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ही चवदार हुरड्याला चांगली असल्याने तालुक्यात अन्य ठिकाणावरून हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. यंदा हुरडा पार्ट्यावरही संक्रांत आली यंदा शिवारात म्हणाव्यात अशी चव हुरडा शौकीनाला चाखता आली नाही. 2017 च्या पावसाळ्यात रब्बी पेरणीच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्या शेतकय्रांनी अगोदर पेरणी केली त्यांना पीक हाताला तर ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीत वापसा लवकर आला नाही. त्यांना उशिरा पेरणी करावी लागली. त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित झाली ज्या ठिकाणी लवकर वापसा आला नाही. त्या ठिकाणी हरभरा, कुरडई हे पीक घ्यावे लागले. करडई पीक देखील यंदा समाधानकारक नसल्याचे शेतकरी बोलू लागले.
हरभरा पीक समाधान कारक आहे. त्यामुळे अडचणीत असलेेेल्या शेतकऱ्यांना यंदा कोणतीच मदत मिळणार नाही. शिवाय ज्वारीच्या पीकाची पेरणी, राखणी, काढणी, पासून ज्वारीचे पीक पोत्यात भरेपर्यंत तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील मजुराला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो बोराळे नाका परिसरात मजुराची गर्दी देखील कमी राहल्याचे दिसत आहे त्यामुळे रोजगार ही कमी प्रमाणात मिळणार आहे.