प्रियाला फॉलो करता, मग तुमची लायकी भजी विकण्याचीच: भाजप नेता
प्रिया प्रकाश वारियर या अभिनेत्रीने गाण्यात डोळा मारल्याने ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचे ट्विटर, फेसबुकवर लाखोंनी फॉलोअर्स वाढले आहेत. तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत असताना भाजप नेत्याने विरोधात वक्तव्य केले आहे.
होशंगाबाद : मल्याळम चित्रपटातील गाण्यातून स्टार झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचे 24 तासांत 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स होत असतील, तर या देशातील युवक भजी विकण्याच्या पात्रतेचे आहेत, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजप नेते संजीव मिश्रा यांनी केले आहे.
प्रिया प्रकाश वारियर या अभिनेत्रीने गाण्यात डोळा मारल्याने ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचे ट्विटर, फेसबुकवर लाखोंनी फॉलोअर्स वाढले आहेत. तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत असताना भाजप नेत्याने विरोधात वक्तव्य केले आहे. तसेच मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून, तिच्या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
संजीव मिश्रा यांनी सध्या देशात अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून, या व्हिडिओ प्रसारित होऊ नये असे म्हटले आहे. तर, दुसरीकडे हैदराबादमध्ये या चित्रपटाचे निर्माते व गीतकारावर भावना भडकावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता.