उमेदवारांसमोर 'कोणता झेंडा घेऊ हाती?' असा प्रश्न..
मांजरी (पुणे) : मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दाखल झालेले सर्वच्या सर्व उमेदवीरी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे पॅनेलमध्ये कुणाला घ्यावे आणि कुणाला वगळावे, असा पेच प्रमुखांना पडला आहे. तर दुसरीकडे दोन्ही पॅनेलकडून मागणी असलेले आणि वगळले जाण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांसमोर "कोणता मी झेंडा घेवू हाती ?'' असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
मांजरी (पुणे) : मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दाखल झालेले सर्वच्या सर्व उमेदवीरी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे पॅनेलमध्ये कुणाला घ्यावे आणि कुणाला वगळावे, असा पेच प्रमुखांना पडला आहे. तर दुसरीकडे दोन्ही पॅनेलकडून मागणी असलेले आणि वगळले जाण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांसमोर "कोणता मी झेंडा घेवू हाती ?'' असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
मांजरी बु्द्रुक ग्रामपंचायतसाठी सरपंचपासह अठरा जागांसाठी 107 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथील प्रभाग क्रमांक तीन मधून तीन जागांसाठी सर्वाधिक 23 उमेदवारांनी सदस्य पदासाठी अर्ज भरले आहेत. प्रभाग क्रमांक एक व सहा मधून प्रत्येकी सोळा, प्रभाग क्रमांक चार मधून अठरा, पाच मधून पंधरा तर दोन मधून आठ असे 96 अर्ज सदस्य पदासाठी आले आहेत. तर सरपंच पदासाठी अकरा अर्ज आलेले आहेत. सदस्य पदाच्या निवडणूकीसाठी संपूर्ण गावतून सर्वसाधारण जागेसाठी एकूण 36, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी 19, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 17 तर याच गटातील स्त्री जागेसाठी 10 तसेच अनुसुचित जातीसाठी 11 तर याच गटातील स्त्री जागेसाठी 3 अर्ज आलेले आहेत.
येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-सेना अशा प्रमूख दोन गटात लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. मात्र दोन्हीकडेही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कुणाचा पत्ता कट होईल, याची खात्री नाही. पॅनेल प्रमुखांकडून ज्यांना खात्रीलायक शब्द दिला आहे त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. काही जागांवर तडजोड करून किंवा समोरच्या पॅनेलच्या उमेदवारीवर एेनवेळी उमेदवार बदलण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अनेकांमध्ये धास्तीही आहे. पॅनेलच्या दृष्टीने तगड्या उमेदवारांकडे दोन्ही प्रमुखांचे लक्ष आहे. त्यांना आपलेसे करण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये आता नेमके कोठे जावे आणि कोणाचा झेंडा हाती घ्यावा, असा प्रश्र्न उमेदवारांना पडला आहे.
पॅनेल प्रमूखांनाही इच्छुकांच्या उमेदवारी मागणीची डोकेदुखी वाढली आहे. कोणाला बसवावे, कशी समजूत घालावी, आणि शांत केल्यानंतर त्याची मदत कशी घ्यावी, अशा पेचात हे प्रमुख पडलेले दिसतात. उद्या (ता. 16) उमेदवारी माघे घेण्यासाठीची मुदत असल्याने नको त्यांना खाली बसविण्यासाठी आणि हवे त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रमुखांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक प्रकारे आपल्याला हवे ते उमेदवार घेता आले पाहिजेत यासाठी सर्व प्रकारांनी त्यांना समजावले जाताना दिसत आहे.
आघाडीसाठी अपक्षांची चाचपणी -
प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल केली आहे. ज्यांना
पॅनेलमधून उमेदवारी मिळणार नाही ते काही नाराज व अपक्षांची उमेदवारी कायम
राहिल्यास एकत्र येऊन प्रभाग पातळीवर आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असलेला दिसत आहे. त्यासाठी अशा उमेदवारांकडून चाचपणी केली जात आहे.