"हिरण्यकेशी'त पाण्यासाठी उद्या बेळगावात आंदोलन
संकेश्वर - हिरण्यकेशी नदीत महाराष्ट्रातून पाणी न सोडल्याने हिरण्यकेशी पाणी संघातर्फे बेळगाव येथे शुक्रवारी (ता.16) सकाळी साडे दहाच्या सुमारास पाटबंधारे कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

हिरण्यकेशी नदीत महाराष्ट्रातून अर्धा टीएमसी पाणी कायमस्वरुपी मिळावे, या मागणीकरिता 28 जानेवारीला बेळगाव येथील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर येथील हिरण्यकेशी पाणी पुरवठा संघाने धरणे सत्याग्रह केला होता. त्यावेळी पाटबंधारे खात्याचे गुरुपाद स्वामी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन 15 दिवसाची मुदत देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याला 15 दिवस उलटूनही हालचाली न झाल्याने संघाने पुन्हा बेळगाव येथे शुक्रवारी (ता. 16) धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शंभरहून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिलकुमार हिरेमठ यांनी दिली.
तोडगा काढण्यासाठी योग्य वेळ घ्या, निर्णय घ्या किंवा असमर्थता असेल तर तसे राज्यपालांना पत्र द्या. आम्ही या प्रस्तावासाठी राज्यपालांना भेटून न्याय मागू. आमच्या वाट्याचे हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, असेही हिरेमठ यांनी सांगितले.