बाळासाहेब वर्पे यांना 'उत्कृष्ट अधिकारी' पुरस्कार 

हरिभाऊ दिघे
09.42 AM

तळेगाव दिघे(नगर) - संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील भूमिपुत्र व राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक बाळासाहेब हरिभाऊ वर्पे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे(मुंबई) 'उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मुंबई (प्रभादेवी) येथील रविंद्र नाट्य मंदिरात हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. प्रसंगी राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद मैद, उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ वर्पे, सौ. शोभाताई वर्पे सहित मान्यवर उपस्थित होते. 

बाळासाहेब वर्पे हे संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे चिरंजीव आहे. उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब वर्पे यांचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे सहित मान्यवरांनी अभिनंदन केले.

Web Title: marathi news wstern maharashtra news awards nagar