पोलीस स्टेशन, इमारतीचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणारः डॉ.पाटील

सकाळ वृत्तसेवा
06.19 PM

नाशिक : शहरांच्या विकास आराखड्यामध्ये जागा आरक्षित नसल्याने पोलीस ठाण्यांसाठी जागा नाही. मात्र महापालिकेच्या माध्यमातून भाभानगर (मुंबईनाका) आणि गंगापूर पोलीस ठाण्यांसाठीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न घेतले जातील, असे सांगतानाच पोलीस वसाहतीचे ब्रिटिशकालिन रुपडे पलटविण्यासाठीही जो आराखडा पोलीस आयुक्तालयाकडून सादर करण्यात आला, त्यासही मूर्तस्वरुप दिले जाईल असे आश्‍वासन देत नाशिक पोलीस आयुक्तालयाने राबविला जात असलेला "नो हॉर्न डे' उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी हाती घेतला जाईल असे प्रतिपादन, गृह (शहरे) व नागरी विकास आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. 

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात आयोजित विविध विकासकामांच्या भूमीपूजन समारंभाप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका प्रियंका घाटे, हिमगौरी आहेर, शितल भामरे, सुप्रिया खोड, सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, गोपाळ पाटील आदींसह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे उपस्थित होते. 

प्रारंभी, मुख्यालयातील बॅरेक 17च्या प्रांगणामध्ये पोलीस मुख्यालय वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, घरांची कौले बदलून शिट टाकणे, संरक्षण भिंत उभारणे यासह विविध कामांचे भूमीपूजन राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, देशाअंतर्गत सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीस दलाविषयीच्या निवाऱ्याच्या प्रश्‍नाकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही. राज्यशासनाने सर्वप्रथम हा प्रश्‍न हाताळला असून त्यासाठी स्वतंत्र पोलीस हौसिंग कॉर्पोरेशन निर्माण करून त्यामाध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यासाठी किमान पाचशे स्क्‍वे.फुटाचे आणि अधिकाऱ्यांना त्यांचे कुटूंबिय सुव्यवस्थित राहू शकतील असे घरे उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी 500 कोटींचा निधीही उपलब्ध केल्याचे सांगत, 

प्रास्ताविक आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले तर हिमगौरी आहेर यांनी आभार मानले. यावेळी पोलीस मुख्यालयातील अधिकारी, कुटूंबीय, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. भूमीपूजन सोहळ्यानंतर पोलीस आयुक्तालयामध्ये आढावा बैठकीला उपस्थित राहत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. 

नो हॉर्न डे चे कौतूक 
नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांमधील "नो हॉर्न डे' या अभिनव उपक्रमांचे कौतूक राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी केले. सदरचा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे सांगत, वाढत्या सायबर व आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातही नाशिक पोलीसांची कामगिरीचे कौतुक केले. विशेषत: मैत्रेय-गांवकरी फसवणूकीचा ÷उल्लेख करीत न्यायालयीन दोषसिद्धीमध्येही नाशिक पोलीसांचा क्रमांक राज्यात वरचा असल्याचे सांगत पोलीसांच्या पाठीवर शाबासकीचे थाप दिली. तसेच, पोलीस सोशेलायझेनमुळे सामाजिक दरी कमी होऊन समन्वय वाढीस लागला आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांच्या आरोग्यासाठीही शासन पुढाकार घेत असल्याचे सांगितले. 
 
Web Title: marathi news police house problem