एलईडी मासेमारी विरोधात रत्नागिरीत मच्छिमारांचे आंदोलन
रत्नागिरी - गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एलईडी मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. आज अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको तसेच जेलभर आंदोलनही करण्यात आले.

शेकडो आंदोलक मच्छिमारांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्य आणि केंद्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीत पर्ससीन मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे, आणि त्याला मत्स्य व्यवसाय विभागाचा आर्शिवाद असल्याचा आरोप पारंपारिक मच्छिमारांनी केला आहे. तसेच एलईडी लाईटचा वापर करून मच्छिमारी करण्यास परवानगी नसताना ही पर्ससीन नौका अशा प्रकारची मासेमारी करत आहेत. यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर समोर आल्यानंतर तेथे आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून बसले. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ही कायद्याची लढाई आहे. कायद्यानेच आम्ही आमचा हक्क मिळवू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.