महापालिकेत नोकरभरतीच्या आशा पल्लवित 

सकाळ वृत्तसेवा
07.40 PM

नाशिक: शहराचा विस्तार वाढतं असताना अपुऱ्या मनुष्यबळात काम करणे अशक्‍य होत असल्याने यापार्श्‍वभूमीवर अनेक वर्षांपासून महापालिकेचा नवीन आकृती बंध मंजूर करण्याची मागणी पुर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर महापालिकेचा प्रलंबित आकृतीबंध मुख्यमंत्र्यासमोर सादर करून त्यास मंजुरी देणार असल्याचे सांगितल्याने पालिकेत येत्या काळात मोठी नोकरभरती होणार आहे. नव्या आकृतीबंधानुसार पालिकेत रिक्त व नवीन अशा सुमारे साडे नऊ हजार पदांची भरती होण्याची दाट शक्‍यता आहे. 

नाशिक महापालिकेला पुर्वी क वर्ग होता. त्यानुसार सन 1993 पर्यंत 7090 पदांचा आकृतीबंध शासनाने मान्य केला होता. परंतू पालिकेला ब वर्ग प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार नवीन आकृतीबंध तयार करून सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नवीन 7656 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यापुर्वीच्या 7090 पदांपैकी एक हजार 823 पदे सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे रिक्त झाली आहेत. त्यामुळे नवीन सात हजार 656 व रिक्त 1823 अशा 9679 पदांची भरती होणार आहे. आकृतीबंध मंजुर झाल्यास पालिकेच्या आस्थापनेवर एकुण 14 हजार 746 पदे राहणार आहेत. नवीन आकृतीबंध मंजुर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आराखडा सादर केला जाणार असून आठ दिवसात त्यावर निर्णय होणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी माहिती दिली. 
-------- 
असा आहे नवीन आकृतीबंध 
सध्या आस्थापना परिशिष्टावर मंजूर 7090 पदांमध्ये अ गटातील 139, ब - 83, क - 2199 व ड गटातील 4669 पदे आहेत. नवीन आकृतीबंधामध्ये अ गटात 275, ब - 109, क - 2437, तर ड गटात 4845 नवीन पदे प्रस्तावित आहे. माध्यमिक शिक्षण विभागासाठी 148 पदे मंजूर आहेत. नवीन आकृतीबंधात 198 पदे आहेत. त्याव्यतिरिक्त महिला बालकल्याण विभागाकरिता प्रकल्प अधिकारी, दोन सहायक प्रकल्प अधिकारी, खत प्रकल्प स्टेशन ऑपरेटर, नऊ विशेष भूमी संपादन अधिकारी, अतिक्रमण विभागासाठी 78 पोलिस, वाहतूक नियोजन कक्षासाठी 91, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, खत प्रकल्पावर तेरा, 98 वाहनचाल, बूस्टर पंपिंग स्टेशनवर कार्यरत 47 कर्मचारी या पदांचा आकृतीबंधात समावेश आहे. 

आयुक्तांचा अधिकार 
महापालिकेत मंजुर पदांपैकी 1823 पदे सध्या रिक्त आहेत. ती रिक्त पदे भरण्याचा अधिकार आयुक्तांचा असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले त्यामुळे आकृतीबंध मंजुर होण्यास विलंब झाला तरी येत्या काळात रिक्त पदांची भरती होणार आहे. 

Web Title: marathi news mahapalika service