औरंगाबादेतील वाळूज येथे कंपनीत भीषण आग; एकाचा मृत्यू
श्रीराम जयराम ठाकरे वय 65 असे त्यांचे नाव आहे. ते मुळ सिल्लोड तालुक्यातील हट्टी माऊली येथे राहात होते. दोन महिन्यांपूर्वी ते विजय प्लास्टिक कंपनीत कामाला असलेल्या फकिरबा ठाकरे या मुलाकडे राहण्यासाठी आले होते.
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत डी सेक्टरमध्ये विजय प्लास्टिक या कंपनीत गुरुवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे कामगाराच्या वडिलांचा होळपळून मृत्यू झाला.
श्रीराम जयराम ठाकरे वय 65 असे त्यांचे नाव आहे. ते मुळ सिल्लोड तालुक्यातील हट्टी माऊली येथे राहात होते. दोन महिन्यांपूर्वी ते विजय प्लास्टिक कंपनीत कामाला असलेल्या फकिरबा ठाकरे या मुलाकडे राहण्यासाठी आले होते. कंपनी परिसरातच काही कामगार कुटुंब राहते. बुधवारी (ता, 14) रात्री भिका यांचे वडील श्रीराम ठाकरे कंपनीतील कार्यालयात झोपले होते.
गुरुवारी पहाटे साडेचारला कंपनीत आग लागली त्यात श्रीराम ठाकरे यांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे पाचपासून अग्निशामक दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते, सकाळी सातला आग पूर्णपणे आटोक्यात आली.