उल्हासनगर : ज्यांनी तुम्हा आम्हाला जन्म दिला,जग दाखवले अशा जन्मदाऱ्यांवरच प्रेम करा.असा अनमोल संदेश देण्यासाठी उल्हासनगरच्या एसएसटीमहाविद्यालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज व्हॅलेंटाईन डे ऐवजी पॅरेन्टाईन डे साजरा करून जन्मदात्यांचे पूजन केले. आपल्या मुलाच-मुलींकडून मिळालेल्या या अनोख्या भेटरुपी प्रेमाने जन्मदात्यांचे डोळे पाणावले.

14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. मात्र सर्वात पहिले प्रेम पाल्यावर आई वडील करतात. त्यांचे ऋण फेडणे हे एका जन्मात तरी शक्य नाही. मात्र त्यांचे कृपाभिलाषी राहण्यासाठी मागील सहा वर्षांपासून फाऊंडर प्राचार्य जे. सी. पुरस्वानी, एनएसएस युनिटचे माजी प्रमुख निलेश कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरेन्टाईन डे साजरा केला जाऊ लागला.
यंदा हा उपक्रम प्राचार्य पुरस्वानी यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला. यंदा शैक्षणिक, विद्यापीठ स्तराच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळालेले विद्यार्थी आणि एनएसएसचे ज्येष्ठ केडर विद्यार्थी असे जवळपास 60 विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले. त्या विद्यार्थ्यांनी पालकांचे पूजन करून ही प्रथा पुढे सुरू ठेवली. यावेळी प्राचार्य अंजन कुमार, उप प्राचार्य भारती पुरस्वानी, नियंत्रक गुणजित कौर, एनएसएस युनिटच्या प्रमुख रीना मिश्रा, अमोल अडांगळे डीएलएल युनिटचे प्रमुख दिलीप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पुरस्वानी यांनी हा उपक्रम भारत भर साजरा झाल्यास भारतीय संस्कृतीवर होणारे विदेशी संस्कृतीचे आक्रमण आणि परिणाम काही प्रमाणात आटोक्यात येतील, असे स्पष्ट करताना प्रत्येक महाविद्यालयात व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पॅरेन्टाईन डे साजरा करण्याचा व जन्मदात्यांच्या पूजनाचा उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचे सांगितले.