पुणे - सकाळ ॲग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होईल.
महाराष्ट्राचा कृषिविकास आणि ग्रामसमृद्धीसाठी धोरणात्मक मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून सरपंच महापरिषदेचा आवर्जून उल्लेख केला जातो. आजपासून सुरू होत असलेल्या सातव्या महापरिषदेत महिला सरपंचांसह एक हजारांहून अधिक सरपंच सहभागी होत आहेत.

ट्रॅक्टरसह अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी
सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांना मौलिक मार्गदर्शनाबरोबरच विविध बक्षिसांचे मानकरी होण्याची संधी मिळणार आहे. महापरिषदेचे मुख्य प्रायोजक ‘फोर्स मोटर्स’ यांच्याकडून भाग्यवान सरपंचाला ऑर्चर्ड ट्रॅक्टर मिळणार आहे. त्यासाठी ड्रॉ काढला जाणार आहे. याशिवाय महापरिषदेचे दुसरे प्रायोजक असलेल्या ‘विक्रम चहा’ यांच्या वतीने राज्यातील दहा गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी डिजिटल क्लासरूम दिले जाणार आहेत. प्रत्येक डिजिटल क्लासरूमसाठी ५५ हजार रुपयांचे साहित्य विक्रम चहाकडून दिले जाणार असून, या भाग्यवान गावांची नावेदेखील ड्रॉ पद्धतीने काढली जातील.
उद्घाटन सत्राचे अॅग्रोवन आणि सकाळच्या फेसबुकवर थेट प्रक्षेपण, वेळ : सकाळी ११ वाजता.
www.facebook.com/AGROWON आणि www.facebook.com/SakalNews