पिरजादे यांच्या घरासमोर राष्ट्रवादीची निदर्शने
कोल्हापूर - स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षाच्या विरोधात मतदान करणारे नगरसेवक अफझल पिरजादे यांच्या घरावर आज राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात आला व त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. महापालिकेसमोरुन मोर्चाची सुरवात झाली. दरम्यान पिरजादे यांच्या घरासमोर निषेधाच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्थायी समिती सभापतीसाठी राष्ट्रवादीतर्फे मेघा पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. सभागृहात पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक अफझल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी पक्षा विरोधात मतदान केल्याने सत्तधारीच्या उमेदवार मेधा पाटील यांचा दोन मतांनी पराभव झाला होता. यानंतर संतप्त कार्यकर्ते आणि नेत्यांनी तातडीची बैठक घेतली होती आणि महाराणाप्रताप चौकात निदर्शने करुन निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी या दोन नगरसेवकांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेपासुन निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आर के पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास आदिंनी केले. बुधवार पेठेतील पिरजादे यांच्या घरासमोर निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्वांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणुन सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.