वाहनचालकांचे प्रबोधन करून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा
कल्याण : प्रेमवीर आज (14 फेब्रुवारी) 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करतात. याचे औचित्य साधून कल्याणमध्ये कल्याण आरटीओ आणि प्रवासी संघटनांनी 'गांधीगिरी' स्टाईलने वाहनचालक, विद्यार्थी, नागरिकांचे प्रबोधन केले. हेल्मेट घातल्याबद्दल दुचाकीस्वारांना फुल देऊन त्यांनी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला.

कल्याण पश्चिममधील लाल चौकी, सोनावणे कॉलेज, बिर्ला कॉलेज, प्रेम ऑटो या परिसरात सकाळी दहापासून हा उपक्रम राबविण्यात आला. हेल्मेट घातलेल्या चारशेहून अधिक चालकांना गुलाबाचे फुल देण्यात आले. हेल्मेट न घालणाऱ्यांना पत्रक देण्यात आले. यावेळी आरटीओचे मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक शिवानी नागरगोजे, राजेश्री पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फडके, पुष्परत्नपारखी, विना टिलावत, निलांबरी घाडगे, निर्मला कदम, तसेच सोनावणे कॉलेजचे विद्यार्थी पूनम चव्हाण, सुप्रिया कदम, प्रिया सोनवणे, सोमनाथ जाधव, समीर शेख आदींनी भाग घेतला.
'आरटीओ आणि प्रवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त चालक, विद्यार्थी, नागरिकांचे रस्त्यावरील सुरक्षेबाबत प्रबोधन केले. सुरक्षा आपल्या हाती असून नियम पाळले पाहिजेत; तसेच आवश्यक नसताना हॉर्न वाजवू नये, अशी शपथही घेण्यात आली' अशी माहिती फडके यांनी दिली.