'व्हेलेंटाईन डे'निमित्त प्रियाचा नवा व्हिडिओ पहा
गेले दोन दिवस प्रिया वारियरच्या आदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या आदा, हावभाव, बोलके डोळे यांमुळे ती एका दिवसातच चर्चेत आली आणि तरूणांच्या दिलाची धडकन बनली. आता तिने 'व्हेलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला आपला आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओची देखील सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.

Please do watch , RT & Reply !! #OruAdaarLove movie teaser pic.twitter.com/IUIH6YzSUv
— Priya Prakash Varrier (@PriyaPVarier) February 13, 2018
गुगलवरही प्रियाच्याच नावाचा बोलबाला असून, गुगल सर्चमध्ये तिच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एवढेच काय तर ट्विटरवरही तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'ओरु अदार लव' (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून प्रिया प्रकाश वारियर ही पदार्पण करणार आहे. त्याआधीच ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. या गाण्यात तिने ज्या प्रकारे तिच्या प्रियकराला डोळा मारला आहे, त्या आदांवर सगळी तरूणाई फिदा झाली आहे.
मल्याळम् चित्रपटातील या गाण्यातील इतरांपेक्षा प्रियाच सर्वात जास्त भाव खाऊन गेली आहे. तिच्यामुळे या गाण्याला काही तासांतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिचा हा नवीन व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.