महापोली येथे 13 दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा संपन्न
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील महापोली येथे 13 दिवस-रात्र टेनिस क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात ठाणे जिल्ह्यातील 126 संघांनी भाग घेतला होता. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भुरे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन झाले.
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील महापोली येथे 13 दिवस-रात्र टेनिस क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात ठाणे जिल्ह्यातील 126 संघांनी भाग घेतला होता. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भुरे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन झाले.
ग्रामीण भागातील महापोली हे गाव या 13 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे नावाजले गेले आहे. या सामन्यांसाठी असंख्य प्रेक्षकांनी हजेरी लावली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज झाला. शहरी भागात भिवंडी प्रथम पारितोषिक 'बी इंडियन' आणि द्वितीय पारितोषिक 'धनेश इलेव्हन' या संघांना मिळाले. ग्रामीण भागात 'जय बजरंग गोरसाई' यांना प्रथम, तर 'पावर शेलार' या संघास द्वितीय पारितोषिक मिळाले.
'या स्पर्धेद्वारे इरफान भुरे यांनी या भागात जातीय सलोखा आणि हिंदू-मुस्लिम भाई-भाई यांचे खेळातून दर्शन घडवून आणले' अशा शब्दांत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापोली क्रिकेट क्लबचे कौतुक केले. या प्रसंगी खासदार हुसेन दलवाई, आमदार जितेंद्र आव्हाड, रुपेश म्हात्रे, पांडुरंग बरोरा, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, निरंजन डावखरे, भिवंडी महापैर जावेद दळवी, नगरसेवक नजीब मुल्ला, सुरेश म्हात्रे, उज्ज्वला गुलवी, दर्शना ठाकरे, किशोर जाधव उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी इरफान भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अदनान भाबे, बाजील पटेल, रमीज पटेल, शैलेश गायकवाड, इमरान शाह आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे निरोप समारंभ सामाजिक कार्यकर्ते मलंग शेख यांनी आयोजकांचे आभार मानून 'हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आदर्श सगळ्यांनी या खेळातून कसा घडला आहे, याचा आदर्श घ्यावा' असे सांगून राष्ट्रगीताने सांगता केली.