सुंजवामध्ये मिळाला आणखी एका जवानाचा मृतदेह
सुंजवा येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून सुरु करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान आणखी एका जवानाचा मृतदेह मिळाला आहे. लष्कराने संबंधित जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. यापूर्वी 5 जवान हुतात्मा झाले, त्यानंतर आता हा आकडा वाढून 6 वर गेला आहे.
नवी दिल्ली : सुंजवा येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून सुरु करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान आणखी एका जवानाचा मृतदेह मिळाला आहे. लष्कराने संबंधित जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. यापूर्वी 5 जवान हुतात्मा झाले, त्यानंतर आता हा आकडा वाढून 6 वर गेला आहे.
जम्मूतील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे "जैशे महंमद'च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले होते. तर अन्य सहा जण जखमी झाले. भारतीय लष्करातील जवान आणि दहशवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक रविवारी सकाळी संपुष्टात आली होती. यादरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर लष्कराकडून चालू केल्या गेलेल्या शोधमोहिमेदरम्यान आणखी एका जवानाचा मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे आता हा आकडा वाढला आहे.