स्वप्निल ढमढेरे यांस क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
तळेगाव ढमढेरे, (ता. शिरूर, पुणे): तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील धनुर्विद्यापटू स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांस महाऱाष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या शनिवारी (ता.17) सायंकाळी 5.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली या मानाच्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वप्निल ढमढेरे हे जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचे पुत्र असून, त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळात अनेकवेळा सुवर्णपदक मिळवून पुण्यासह राज्याचे नाव उंचावले आहे. स्वप्निलला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने तळेगाव ढमढेरेसह शिरूर तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.