रस्ता ओलांडताना कारची धडक बसून तरूणीचा मृत्यू
30 एप्रिलला होणार होते पूजाचे लग्न
पूजा हिचे सोपान दामगुडे यांच्या पुरंदर येथील मेव्हणीच्या मुलासोबत लग्न ठरले होते. येत्या 30 एप्रिलला हे लग्न होणार होते. त्यापूर्वी बालाजी येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी पूजा आली होती. मात्र त्यापूर्वीच तिच्यावर काळाने घाला घातल्याने नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.
पुणे : खेड-शिवापूर येथे रस्ता ओलांडताना मोटारकारची धडक बसून झालेल्या अपघातात पूजा संतोष नलावडे (वय 18, रा. मुळा रोड, भागवान नगर, सोलापूर) या तरुणीचा मृत्यु झाला. पुणे-सातारा महामार्गावर गाउडदरा फाट्यावर मंगळवारी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. राजगड पोलिसांनी या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी जायचे असल्याने पूजाचे गाउडदरा (ता.हवेली) येथील नातेवाईक सोपान दामगुडे हे पूजाला आणायला सोलापुरला गेले होते. ते पूजाला घेऊन सोमवारी रात्री सोलापूरहुन निघाले.
मंगळवारी पहाटे पाच वाजता गाउडदरा फाट्यावर उतरले. यावेळी रस्ता ओलांडत असताना पूजाला साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारगाडीची धडक बसली. या अपघातात पूजा गंभीर जखमी झाली. तीला ताबडतोब उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.
राजगड पोलिसांनी या प्रकरणी मोटारचालक इरविन पासब्रिग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवलदार संतोष तोड़कर पुढील तपास करत आहेत.