निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांची पाठ सोडेना
लातूरमध्ये बाराशे कोंबडीचे पिल्ले मयत
शेतीबरोबर कुकूटपालनाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना या गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत तब्बल बाराशे कोंबडीचे पिल्ले दगावली आहेत. अशी माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
औरंगाबाद : मागील पाच वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभे केले आहेत. आधी कोरडा दुष्काळ, नंतर अतिवृष्टी, यंदा पांढरे सोने असलेल्या कापसाला बोंडअळीने तर आता आती आलेल्या ज्वारी, गहू, हरबरा पिकांचे गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या प्रतापामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
विदर्भासह मराठवाड्यात रविवारी (ता. 11) झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हाती आलेले पीके नाहिसी झाले आहेत. एकट्या मराठवाड्यात या आपत्तीमुळे पन्नास हजाराच्या आसपास हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तसा अहवाल महसूल प्रशासनाने शासनास सादर केला आहे. या बाधीत क्षेत्राचे येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधिताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या आहेत.
विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा गारपीटीच्या नव्या संकटाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसतांनाच दारात येऊ घातलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि तूरीच्या पिकाला आसमानी संकटामुळे मोठा फटका बसला आहे.
लातूरमध्ये बाराशे कोंबडीचे पिल्ले मयत
शेतीबरोबर कुकूटपालनाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना या गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत तब्बल बाराशे कोंबडीचे पिल्ले दगावली आहेत. अशी माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्याचे झाले आहे. जिल्ह्यातील 217 गावातील तब्बल 27 हजार 961 हेक्टर क्षेत्र 33 टक्क्यापेक्षा अधिक बाधीत झाले आहे. तसेच 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपिट झाली. त्यामुळे लहान आणि मोठी अशी 11 जनावरे दगावली आहेत.