लकी ड्रॉचा निकाल
काठीयावाड वॉच हाऊस : सुनंदा पाटील, स्वाती भस्मे, अनुराधा बोधे, शाहीन मुल्ला, कल्पना पाटील, सुमती यादव, भारती महामुनी, शितल जगताप, विद्या खोत, प्रिया रजपूत, सुनंदा निंबाळकर, यशोदा डांगे, ज्योती कोळकर, कविता लिपारे, दिपा थोरात तर ओम एजन्सीकडून मिळणाऱ्या वॉटर प्युरिफाईच्या विजेत्या स्वाती घाडगे ठरल्या.
कऱ्हाड : बुगडी माझी सांडली ग..., यापासून नव्या तालावरील आला बाबुराव आता आला बाबुराव ते बोल मै हलगी बजावु क्या पर्यंतच्या मराठी लावण्यांसह गीतांच्या सादरीकरणावर मधुरांगणच्या सदस्या थिरकल्या. त्यास कारण होते, कऱ्हाडच्या मधुरांगणतर्फे येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात झालेल्या बहारदार लावण्याच्या केला इशारा गीतांच्या कार्यक्रमाचे.
हिवाळ्याचा गारव्यासह प्रसन्न वातावरणांत टाऊन हॉलच्या रंगमंचावर डफ-ढोलकीच्या कडकडाट घुमला अन् घुंगराच्या तालावारील नृत्याने महिलांच्या मनाचा ठाव घेतला. शृंगारीक लावण्यापासून बैठकीच्या लावण्यांनाही मधुरांगणच्या सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ मिळाली.
सकाळ मधुरांगणतर्फे खास महिलांसाठी वर्षातील कार्यक्रम झाला. बाबा पठाण निर्मित केला इशारा कार्यक्रमातून कसलेल्या नृत्यांगणांनी नव्या जुन्या लावण्या उत्कृष्ट अदाकारी, तालबद्ध पडन्यास करत कार्यक्रमात रंग भरला. प्रारंभ गण सादर करता गणेशाला वंदन करून कलाकारांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर पारंपारिक तमाशाचे खास वैशिष्ट्य असलेली गौळण सादर केली. अन महिला ज्यांची आतुरतेने वाट पाहता होत्या, त्या बहारदार लावणी नृत्यांना सुरवात झाली. ढोलकीच्या कडकाडाटात डोळ्यावर पदर घेऊन पाठमोरी नृत्यांगणा घुंगराच्या छणछणाट करत येताच महिलांनी मारलेल्या शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन भरून गेले. या रावजी तुमी बसा भाऊजी, अशी साद घालत हळुहळू पिंजऱ्याच दार उघडा, असे आर्जव करत लावणीच्या इतिहासतच अजरामर झालेली बुगडी अदाकरीतून शोधत नृत्यांगणांनी खऱ्या खुऱ्या पारंपारिक लावण्या त्याच गरतीच्या अदाकारणीने सादर केल्या. प्रत्येक लावणीबरोबर कार्यक्रम पुढे रंगत गेला.
महिला या लावण्यात एवढ्या रंगून गेल्या की त्यांनी मारलेल्या शिट्या अन टाळ्यांचा गजर कितीतरी वेळ यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात भरून राहात होत्या. कलाकार नृत्यांगणानीही हातचे काही राखून न ठेवता आज महिलांना लावण्याचा पुरेपूर आनंद दिला. एवढा की महिलांनीही त्यांच्यासमवेत काही काळ नृत्याचा ठेका धरला. प्रारंभी कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कऱ्हाड नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. आशाताई मुळे यांनी शुभेच्छा दिल्या. तर सहप्रायोजक जावेद हबीबचे प्रतिनिधी त्यांच्या सर्वीसबद्दल माहिती दिली. सोबत अर्जुन कोळी यांनी सकाळ मधुरागणचे कौतुक केले आणि थाटबाटच्या पार्टनर सौ. मनिषा पाटील यांनीही त्यांच्या सर्व्हीसबद्दल माहिती दिली. सोबत स्वामी एंटरप्रायजेसचे आणि एकपोटे फर्निचरच्या मालकीन स्नेहा तवटे यांनी कार्यक्रमास भेट दिली. लकी ड्रॉ चे प्रायोजक ओम एजन्सी व काठीयावाड वॉच हाऊस यांचे लकी ड्रॉ काढण्यात आले. सकाळ चे कऱ्हाड कार्यालयातील वितरण प्रमुख संतोष कुलकर्णी यांनी प्रायोजकांचे स्वागत केले. सातारा शाखा मधुरांगणच्या सहायक व्यवस्थापक सौ. चित्रा भिसे यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड मधुरांगण सहसंयोजिका नयन लोकरे यांनी आभार मानले.
लकी ड्रॉचा निकाल
काठीयावाड वॉच हाऊस : सुनंदा पाटील, स्वाती भस्मे, अनुराधा बोधे, शाहीन मुल्ला, कल्पना पाटील, सुमती यादव, भारती महामुनी, शितल जगताप, विद्या खोत, प्रिया रजपूत, सुनंदा निंबाळकर, यशोदा डांगे, ज्योती कोळकर, कविता लिपारे, दिपा थोरात तर ओम एजन्सीकडून मिळणाऱ्या वॉटर प्युरिफाईच्या विजेत्या स्वाती घाडगे ठरल्या.