धार्मिक उपक्रमांनी महाशिवरात्र साजरी
हडपसर (पुणे) : परिसरात ओम नमः शिवायच्या जयघोषात सुरू असलेले अभिषेक, महारूद्राभिषेक, होमहवन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे महाशिवरात्र साजरी करण्यात आली. महादेव मंदिरात मोठया संख्येने भाविकांनी दर्शनासाठी मंगळवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. शिवलिंगाला दूध किवा उसाच्या रसाचा अभिषेत आणि त्यानंतर बेलाची पाने वाहण्यात येत होती. महाशिवरात्रीला शंकराला कवठ अर्पण करण्याची प्रथा आहे, त्याचेही पालन केले जात होते.

भाविकांकडून अभिषेक, प्रसादवाटप, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करतात. दरम्यान, विविध मंदिरांमध्ये केळीवाटप, खिचडी वाटप करण्यात आले.
लोहिया उद्यान येथील चंद्रमौलेश्र्वर महादेव मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून अभिषेक सुरू झाले होते. लघुरुद्र, अष्टक स्तोत्र, मूलमंत्र पठण, देवाची अलंकारिक पूजा, होम हवन, नृत्य स्वर संगीत पूजा आणि हरिहर भेट सोहळा आणि रात्री देवाचा लग्न सोहळा आणि महाआरतीचे आयोजन केले असल्याची माहिती चंद्रकांत मगर, सतीश फोफलिया, रमेश तुपे, रामदास तुपे, दिलीप गवळी, राजू माने, रमेश दंडाले, चंदू मगर, अविनाश तुपे, हेमंत भोसले, लाला सोनावणे, योगेश गोंधळे, शशिकला माने, दुर्गा मगर, भाग्यश्री बिचुकले यांनी दिली. या मदिरांत दरवर्षी लाखाहून अधिक भाविक दर्शन घेतात. रामटेकडी वरील उदाशीनबाबा मठात तसेच सोलापूर रस्त्यावरील शंकरमंठात देखील शिवभक्तांनी महादेव मंदिरात दर्शनांसाठी गर्दी केली होती.