मनमाड वीज उपकेंद्र क्षमता
नाशिक ः मनमाड येथील विजेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राची क्षमता 132 किलोवॅटवरून 220 किलोवॅट करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 94 कोटी 16 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाची कारागृहातून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे आणि तारांकित प्रश्नाद्वारे मागणी केली होती.

येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये मनमाड उपकेंद्रातून कमी दाबाने वीजपुरवठा असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे मनमाड उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी छगन भुजबळांनी पाठपुरावा केला. नव्या प्रकल्पामुळे येवला व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. दोन्ही तालुक्यातील उपकेंद्रांना पुरेसा व नियमित वीजपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची लवकर सुरवात होईल, असे श्री. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी म्हटले आ