कल्याण : कल्याण पूर्व मध्ये कोकणातील रहिवासी मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना एकत्र आणण्यासाठी कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने रविवार ता 18 फेब्रुवारी 2018 ते रविवार ता 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत पहिले कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व मधील कोकण महोत्सवाच्या पहिला दिवस रविवार ता 18 फेब्रुवारी 2018 असून सुरुवात दुपारी चार वाजता कल्याण पूर्व मधील तिसाई देवी मंदिर येथून दुपारी 4 वाजता कोकण संस्कृतीचा वाजत गाजत पालखी सोहळा असणार असून कोकण महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता आमदार गणपत गायकवाड आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थित होणार आहे.
पहिल्या दिवसापासून समारोप दिवसापर्यंत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रम आणि कोकण महोत्सव कल्याण पूर्व मधील पोटे मैदानात संपन्न होणार असून या महोत्सवात कोकणातील क्रीडा, कला, संस्कृती, खाद्याचा आस्वाद लुटता येणार असून नागरीकांनी प्रत्येक दिवशी हजेरी लावून कोकण महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन केडीएमटी परिवहन समिती सदस्य आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष म्हस्के यांनी केले आहे .