स्टेट बँकेच्या शेअरमध्ये घसरण
आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात दोन टक्क्यांनी घसरला. शेअर इंट्राडे व्यवहारात 285 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.
मुंबई: थकीत कर्जे आणि त्यासाठी केलेल्या भरीव तरतुदींचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेला सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 1 हजार 887 कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात दोन टक्क्यांनी घसरला. शेअर इंट्राडे व्यवहारात 285 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. गेल्यावर्षी याच तिमाहीत बॅंकेला 2 हजार 152.14 कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत थकीत कर्जांसाठी बॅंकेला तब्बल 17 हजार 759.72 कोटींची तरतूद करावी लागली आहे. यामध्ये 145 टक्क्यांची वृद्धी झाली. याच तिमाहीत एकूण थकीत कर्जे 1.99 लाख कोटींपर्यंत वाढली आहेत. सलग तीन तिमाहींमध्ये थकीत कर्जे वाढल्याने बॅंकेला मोठी तरतूद करावी लागली आहे. त्याआधीच्या दुसऱ्या तिमाहीअखेर 1.86 लाख कोटींची थकीत कर्जे होती. 2017-18 या वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत बॅंकेकडे 1.08 लाख कोटींची थकीत कर्जे होती. बॉंडचा परतावा कमी झाल्याचा फटका बॅंकेला बसला आहे. शिवाय कॉर्पोरेट बुडीत कर्जांसाठी तरतूद करावी लागली असल्याचे "एसबीआय"चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले. व्याजाव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात 29.75 टक्क्यांची घट झाली असून 8 हजार 84 कोटी मिळाले आहेत. इतर स्त्रोतातील उत्पन्नात मात्र 5.71 टक्क्याची घट झाली असून 4 हजार 710 कोटी मिळाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. समूहातील सहयोगी बॅंकांना सामावून घेतल्यानंतर "एसबीआय" सावरत आहे. सहयोगी बॅंकांचा लेखाजोखा "एसबीआय"मध्ये विलीन झाला असून त्याचे प्रतिबिंब एकूण कामगिरीवर दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 2.16 म्हणजेच 6.40 रुपयांच्या घसरणीसह 290 रुपयांवर व्यवहार करतो आहे.