e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

पक्ष्यांची हुरडा पार्टी! 

12.06 PM

परशुराम कोकणे

यंदा सोलापूर परिसरात हुरडा पार्ट्यांनी चांगलाच जोर आला आहे. शेतकरी बांधव त्यांच्या मित्रपरिवाराला शेतात हुरडा खाण्यासाठी आमंत्रित करत असून याच काळात ज्वारीच्या पिकावर अनेक पक्षी दिसून येत आहेत. पक्ष्यांचे खाद्य प्रामुख्याने कीटक आणि आळ्या असून काही पक्षी कोवळ्या हुरड्यावर ताव मारताना दिसत आहेत. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड जोपासणारे डॉ. व्यंकटेश मेतन यांनी कणसावर बसलेल्या अनेक पक्ष्यांना कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

आपण हुरडा पार्टीसाठी जातो तेव्हा शेतात अनेक पक्षी ज्वारीच्या कणसांवर बसलेले आढळतात. काही पक्षी हुरडा खाण्यात मग्न असलेले आढळतात. परदेशातून आलेले आणि आपले रहिवासी पक्षी यांची एकत्र हुरडा पार्टी चाललेली दिसून येते. सोलापूरकर पक्ष्यांच्याबाबत नशीबवान आहेत, कारण आपल्या भागात परदेशातून येणाऱ्या आणि आपल्या रहिवासी पक्ष्यांचे खूपच जवळून निरीक्षण करता येते. निरीक्षणासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर्स सोलापूरला येत आहेत. उदिपाठीचा खाटीक, काळ्या डोक्‍याचा भारिट, पारवा, भोरडी, भारिट, सातभाई, कोतवाल, गप्पीदास, पिवळा धोबी, साधा वटवट्या, रान वटवट्या आदी पक्षी दिसून येतात, असे डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले. 

हुरड्याचा मोसम हा पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी एक पर्वणीच असतो. पक्षी जेव्हा ज्वारीच्या कणसांवर बसतो तेव्हा तो बराच स्थिर बसतो. यामुळे पक्षी निरीक्षणासाठी वेळ मिळतो. मी सोशल मीडियावर शेअर केलेली पक्ष्यांच्या हुरडा पार्टीची छायाचित्रे पाहून देशभरातील अनेक फोटोग्राफर मित्रांनी कणसावरील पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यासाठी पुढील वर्षी सोलापूरला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रहिवासी पक्षी आणि परदेशातून येणारे पक्षी सोलापूरच्या वैभवात भर पाडतात. पक्ष्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. अनेक गोष्टींसाठी सोलापूर प्रसिद्ध आहेच पण एक सोलापूरप्रेमी म्हणून सोलापुरातील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. आपण या पक्ष्यांचा अधिवास जपला तर सोलापूर हे देशातील एक चांगले "पक्षीधाम' म्हणून प्रसिद्ध होईल, यात शंका नाही. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, 
वाइल्ड लाइफ फोटोग्राफर

bird hurda party पक्ष्यांची हुरडा पार्टी!  | eSakal