e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

पावसकर नर्सिंगचा परवाना तात्पुरता रद्द - डॉ. प्रल्हाद देवकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - शहरातील शिवाजीनगर येथील पावसकर नर्सिंग होमचा परवाना चौकशी होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी तात्पुरता रद्द केला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी ज्ञानदा पोळेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी केला.

रत्नागिरी - शहरातील शिवाजीनगर येथील पावसकर नर्सिंग होमचा परवाना चौकशी होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी तात्पुरता रद्द केला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी ज्ञानदा पोळेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी केला. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, उदय सामंत यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर हललेल्या यंत्रणेने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई केली.

ज्ञानदा पोळेकर हिच्या वादग्रस्त मृत्यूनंतर डॉ. देवकर यांनी पावसकर हॉस्पिटलला भेट दिली. तेव्हा कोणी जबाबदार डॉक्‍टर तेथे नव्हते. या प्रकरणाशी संबंधित फाईल्स आणि कागदपत्र त्यांनी ताब्यात घेतली. चौकशीदरम्यान प्रथमदर्शी हॉस्पिटलचा हलगर्जीपणा दिसून येतो. अटी-शर्थीचे उल्लंघन केल्याचे पुढे दिसते. त्यामुळे तत्काळ नोटीस बजावून पावसकर हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात येईल, तशी तक्रार आरोग्य संचालकांकडे करण्यात येईल, असे डॉ. देवकर यांनी सांगितले. 

पावसकर हॉस्पिटलमध्ये पत्रकार प्रणव पोळेकर यांच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर या प्रसूतीसाठी ५ फेब्रुवारीला दाखल झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी प्रसूती होऊन त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर चौथ्या दिवशी ज्ञानदा पोळेकर यांना घरी सोडले. रुग्णालयातून घरी सोडल्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्ञानदा पोळेकर यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना शनिवारी सायंकाळी पुन्हा पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

डॉ. पावसकर पुणे येथे गेल्या होत्या. रुग्णालयात कोणीही जबाबदार वैद्यकीय अधिकारी नसताना पोळेकर यांना दाखल करून घेतले. तेथील महिला कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून सूचना देऊन डॉ. पावसकर यांनी पोळेकर यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र आज सकाळी पाच वाजता पोळेकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना परकार हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. परकार हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत झालेला उशीर ज्ञानदा पोळेकर यांच्या जिवावर बेतला आणि रविवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे परकार हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रणव पोळेकर यांच्या पत्नीच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व पत्रकार, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, भाजपचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्र जमले. पावसकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचे प्रणव पोळेकर यांनी खासदार, आमदारांना सांगितले. वारंवार घडणाऱ्या घटना, भविष्यात घडू नयेत, यासाठी या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आमदार राजन साळवी, उदय सामंत, पत्रकार पावसकर हॉस्पिटलवर धडकले. 

त्यावेळी हॉस्पिटलमध्ये एकही जबाबदार वैद्यकीय अधिकारी नव्हता. महिला कर्मचाऱ्यामार्फत कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आले. आमदार सामंत आणि आमदार साळवी यांनी पोळेकर यांच्यावर झालेल्या उपचाराची माहिती विचारली. मात्र थातुरमातूर उत्तरे देण्यात आली. तसेच पोळेकर यांची फाईल देण्यासही टाळाटाळ केली. आमदार, पत्रकारांनी काही कागदपत्रे मिळवून जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली. पत्रकार आणि आमदार यांच्या भेटीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी तत्काळ पावसकर रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तिथे माहिती घेतल्यानंतर पुढील चौकशी होईपर्यंत पावसकर रुग्णालयाचा परवाना निलंबित केल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले. 

हात जोडून विनंती करतो 
पत्नीचा अनपेक्षित मृत्यू झाल्यानंतर प्रणव पोळेकर या धक्‍क्‍यातून सावरणे कठीण होते. एकीकडे अर्धांगिनीचे जाणे आणि दुसरीकडे पाच दिवसांच्या बाळाच्या डोक्‍यावरून आईचे छत्र हरवणे, ही बिकट परिस्थिती त्यांच्यासमोर होती. हा  प्रसंग अन्य कोणावर ओढूवू नये, रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा सुधारावी, यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनवणी केली. साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्या रत्नागिरीच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होण्याची  गरज आहे. आज माझ्यावर हा प्रसंग आला, उद्या दुसऱ्यावर येऊ नये. याची तुम्हीच जबाबदारी घ्या, काही तरी करा. शनिवार, रविवारी एकही खासगी डॉक्‍टर भेटत नाही. काही घडले तर जायचे कुठे.

Web Title: Ratnagiri News Pawaskar nursing license temporarily canceled

Ratnagiri News Pawaskar nursing license temporarily canceled पावसकर नर्सिंगचा परवाना तात्पुरता रद्द - डॉ. प्रल्हाद देवकर | eSakal