जखमी होऊनही जवानाच्या पत्नीने दिला मुलीला जन्म
शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणाले, की आमच्यासाठी ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती. आमच्या पथकाने केलेल्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या पथकाने चांगले काम केले असून, बाळ व बाळाची आई सुखरुप आहेत.
जम्मू - जम्मू जवळील सुंजवा येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी होऊनही एका जवानाच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. लष्कराच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाच्या गर्भवती पत्नीला गोळी लागल्याने ती जखमी झाली होती. तिला तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून तिची प्रसुती केली. या महिलेने मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर महिलेने लष्कराचे आभार मानले आहेत. लष्करात रायफलमॅऩ असलेल्या नजीर अहमद यांच्या त्या पत्नी आहेत.
महिला म्हणाली, की माझे आणि मुलीचे आयुष्य वाचविणाऱ्या लष्कराचे मी आभार मानते. तर, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणाले, की आमच्यासाठी ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती. आमच्या पथकाने केलेल्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या पथकाने चांगले काम केले असून, बाळ व बाळाची आई सुखरुप आहेत.