बांधकाम क्षेत्रात नियोजन महत्त्वाचे - शांतीलाल कटारिया
लोणी काळभोर (पुणे) : भविष्यात बांधकाम क्षेत्रातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. टिकाऊ व मजबूत बांधकामासाठी नियोजनाची गरज असते. नियोजनाअभावी बांधकाम क्षेत्राला महत्व नसल्याचे मत क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भविष्यात याकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांनी काम करणारे नव्हे, तर अनेकांच्या हाताला काम देणारे बनले पाहिजे, असा कानमंत्रही कटारिया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
लोणी काळभोर (पुणे) : भविष्यात बांधकाम क्षेत्रातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. टिकाऊ व मजबूत बांधकामासाठी नियोजनाची गरज असते. नियोजनाअभावी बांधकाम क्षेत्राला महत्व नसल्याचे मत क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भविष्यात याकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांनी काम करणारे नव्हे, तर अनेकांच्या हाताला काम देणारे बनले पाहिजे, असा कानमंत्रही कटारिया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या विद्यमाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट परिषदेचे उदघाटन कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कटारिया यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड होत्या.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील राय, पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, पीसीईआरएफचे अध्यक्ष विश्वास लोकरे, जयकुमार इन्फास्ट्रक्चरचे युसूफ इनामदार, राजीव नेहरू, मिटकॉमचे विवेक सिंग आदी उपस्थित होते. यावेळी कटारिया म्हणाले, बांधकाम आणि तंत्रज्ञान व वाहतूक व्यवस्थेत करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करताना एसी कार्यालयापेक्षा प्रत्यक्ष साईटवर जाऊन कामाचा अनुभव घेतल्यास यशस्वी होता येईल. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आतापासून दुसऱ्यांच्या हाताला काम देणारा बनणार याचा विचार करून नियोजन करावे. देशात भविष्यात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी करावी.
प्रा. सुनीता मंगेश कराड म्हणाल्या, पायाभूत सुविधा या भारताच्या आर्थिक उत्पन्नाची चावी आहे. बांधकाम आणि वाहतूक व्यवस्था या क्षेत्रात जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे आणि प्रत्यक्ष कामावरील अनुभावाचे शिक्षण देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्याला मेट्रो टुरिझम बनवणार -
पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. जागतिक स्तरावरील सर्व सुविधा या कामी उपलब्ध करून दिल्या आहेत. कॉमन मोबिलिटी कार्ड, ग्रीन मेट्रो सोलार स्टेशन, वेगवेगळ्या पद्धतीचे स्थानक डिझाईन, फ्री वाय-फाय, सायकल सेवा, पार्किंग सुविधा, सर्व स्थानक बस सेवेच्या जाळाने जोडणार, पदपथ, रेन वाटर हार्वेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जागतिक स्तरावरील मेट्रो सुविधांबरोबरच मेट्रो टुरिझम बनविण्यावर आमचा भर असेल, असे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्यातर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट परिषदेच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र मेट्रोचे कार्यकारी अध्यक्ष रामनाथ सुब्रमण्यंम् यांनी सांगितले.