e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे - डॉ.विजय शिंदे

राजकुमार थोरात
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुलींनी नियमित योगा, व्यायाम व मैदानी खेळामध्ये सहभाग घेण्याची गरज असल्याचे मत बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ.विजय शिंदे यांनी व्यक्त केले.

कळंब (ता.इंदापूर) येथे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये मुलींचे मानसिक आरोग्य या विषयावर बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ.बबन भापकर, अरुण कांबळे, दयानंद मिसाळ, हमीद काझी, डॉ.सुहास भैरट, डॉ.रामचंद्र पाखरे, ज्ञानेश्‍वर गुळीग उपस्थित होते. यावेळी  शिंदे यांनी सांगितले की, मुलींचे शारिरीक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक गरजेचे आहे.

प्रत्येकाने सामाजिक जीवन जगत असताना अडचणी, संकटावर वरती मात करुन धैर्याने सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तीच व्यक्ती आपले जीवन यशस्वीपणे जगू शकते त्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे असते. यासाठी चांगले छंद जोपासणे, योग्य आहार घेणे तसेच नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, मैदानी खेळामध्ये सहभाग होणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी व वाईट सवयी कोणत्या हे प्रत्येकाने ठरवणे गरजेचे असल्याचे  शिंदे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. आहेर यांनी सांगितले की, मुलींनी मानसिक ताण-तणाव घेवू नये. त्यांना काही अडचणी असल्यास शाळेतील शिक्षक, प्राचार्य, जवळच्या मैत्रीणीशी बोलून मन मोकळे करावे. प्रत्येक अडचणीमधून सहज मार्ग काढता येत असल्याने मानसिक तणाव न घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जाधव व आभार संध्या जामदार यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news mentally stable women

Marathi news pune news mentally stable women यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे - डॉ.विजय शिंदे | eSakal