e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

नद्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिका मागवणार "आयडिया'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई - मुंबईतील नद्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ कंपन्यांकडून आयडिया मागवल्या आहेत. या नद्यांमध्ये जाणारे मलजल आणि सांडपाणी रोखून नद्यांच्या सुशोभीकरणासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी स्वारस्याची अभिरुची मागविण्यात आली आहे; तर मिठीचाही याच धर्तीवर विकास करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी पालिकेने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या नद्यांचा कायापालट होईपर्यंत नद्यांमधून समुद्रात कचरा जाऊ नये, म्हणून पात्रमुखांवर "फ्लोटिंग ट्रॅश बूम्स' बसविण्यात येणार आहे.

मुंबईतील दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्यांचे सुशोभीकरण करून त्यात जाणारे मलजल आणि सांडपाणी रोखण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या नद्यांच्या परिसराचा पर्यटनांच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका तज्ज्ञ कंपन्यांकडून आयडिया मागवणार आहे. यातील सर्वांत चांगला आणि किफायतशीर पर्याय सुचविणाऱ्या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येईल, असे अभियांत्रिकी सेवा विभागाचे उपायुक्त विनोद चिटोरे यांनी सांगितले.

या तीन नद्यांच्या धर्तीवर मिठी नदीचाही विकास करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news river development municipal

mumbai news river development municipal नद्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिका मागवणार "आयडिया' | eSakal