जुन्नर : हिवरे खुर्दला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
जुन्नर (पुणे) : हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला आज (ता.12) यश आले असून या आधी वनविभागाने याच परिसरात बिबट्या जेरबंद केला होता.
जुन्नर (पुणे) : हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला आज (ता.12) यश आले असून या आधी वनविभागाने याच परिसरात बिबट्या जेरबंद केला होता.
याबाबत नारायणगाव वनविभागाच्या वनपाल मनीषा काळे व वनरक्षक कांचन ढोमसे यांनी अशी माहीती दिली की, आज (सोमवार) सकाळी हिवरे खुर्द गावच्या हद्दीत जाधव मळा परिसरात वनविभागाने बिबट्या पकण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट अडकला. सदर बिबट मादी जातीचा असुन अंदाजे चार ते पाच वर्ष वयाचा आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला सुरक्षित रित्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोहचवले.
हिवरे खुर्द गावच्या हद्दीत जाधव मळ्यातच बिबट्याने 21 जानेवारीला हल्ला करुन उसतोड करणारी महिला कामगार ठार केली होती. त्यामुळे येथिल बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.