डोळा मारून घायाळ करणारी 'ती' आहे कोण?
'ती'च्या आदा, हावभाव, बोलके डोळे यांमुळे ती एका दिवसातच चर्चेत आली आणि तरूणांच्या दिलाची धडकन बनली..कोण आहे ती?.. मग तिचा शोध सुरू झाला...
कालपासून सोशल मिडीयावर एक 'नजरेने घायाळ' करणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'ती'च्या आदा, हावभाव, बोलके डोळे यांमुळे ती एका दिवसातच चर्चेत आली आणि तरूणांच्या दिलाची धडकन बनली..कोण आहे ती?.. मग तिचा शोध सुरू झाला...
'ओरु अदार लव' (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून पदार्पण करणारी 'ती' दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे, प्रिया प्रकाश वारियर..कालपासून तिने इंटरनेट जगताला अक्षरश: वेड लावलंय. विशेष म्हणजे या गाण्यात तिने ज्या प्रकारे तिच्या प्रियकराला डोळा मारला आहे, त्या आदांवर सगळी तरूणाई फिदा झाली आहे. गाण्यातील इतरांपेक्षा प्रियाच सर्वात जास्त भाव खाऊन गेली आहे. तिच्यामुळे या गाण्याला काही तासांतच प्रचंड लोकप्रियता मिळाली.
प्रियाच्या या दिलखेचक अंदाजामुळे सर्व सोशल मिडीयाच्या प्लॅटफोर्मवर तिलाच सर्वाधिक सर्च केले जात आहे. तिच्या या गाण्यासोबतच तिचे फोटो व त्याबरोबर 'वैसे तो मैं सख्त लौंडा हूं, लेकिन कभी कभी पिघल जाता हूं' ओळींना तरूणाईने डोक्यावर घेतले आहे. या 'व्हेलेंटाईन डे'च्या आठवड्यात हे गाणे प्रसिध्द झाल्यामुळे, येत्या व्हेलेंटाईन डेला हेच गाणे व तिच्या आदा सगळीकडे बघायला मिळतील. 3 मार्चला हा चित्रपट सगळीकडे प्रसिध्द होईल.