e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

गारपीट व अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा - पांडुरंग फुंडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई - 'विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी,'' असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले.

राज्यातील ज्या भागात आज अवकाळी पाऊस व गारपीट झाली, त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली.

'गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणीपश्‍चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधित विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसांतील माहितीही ईमेलद्वारे देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देत येईल,'' असे फुंडकर यांनी म्हटले आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनीदेखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सूचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Web Title: mumbai news maharashtra news hailstorm loss pandurang phundkar

mumbai news maharashtra news hailstorm loss pandurang phundkar गारपीट व अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा - पांडुरंग फुंडकर | eSakal