e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

शोपियनप्रकरण ; मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

काही दिवसांपूर्वी शोपियनच्या गानोव्हपोरा गावात दगडफेकीची घटना घडली होती. या गावात दगडफेक करणाऱ्या हिंसक जमावावर लष्कराला गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

नवी दिल्ली : शोपियनमध्ये झालेली दगडफेक रोखण्यासाठी लष्कराने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी मेजर आदित्य कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही.

Shopian

मेजर कुमार यांचे वडील लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. करमवीर सिंह यांनी याबाबत दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शोपियनच्या गानोव्हपोरा गावात दगडफेकीची घटना घडली होती. या गावात दगडफेक करणाऱ्या हिंसक जमावावर लष्कराला गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

कमरवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही आणि त्यांना अटकही करता येणार नाही. तसेच याबाबत जम्मू-काश्मीर सरकारला दोन आठवडयांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Web Title: Marathi News National News Shopian Issue Major Kumar Supreme Court

Marathi News National News Shopian Issue Major Kumar Supreme Court शोपियनप्रकरण ; मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती  | eSakal