आरटीईअंतर्गत राखीव जागांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज
सातारा - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांतर्गत प्रवेश घेण्यासाठी www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील २३४ शाळांमधील दोन हजार ४६३ जागा उपलब्ध असून गेल्या दोन दिवसांत ७४ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.

वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये एंट्री पॉइंटनुसार विनाशुल्क प्रवेश मिळावा, यासाठी राज्यात २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया शनिवारपासून (ता.१०) सुरू झाली. प्रवेश प्रक्रियेसाठी असलेल्या संकेतस्थळावर ‘आरटीई पोर्टल’वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरता येतो. विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क शासन भरते. प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश दिलेल्या मुदतीत घेणे बंधनकारक आहे, मुदतीनंतर शाळेच्या, पालकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोडखाली क्रमांक ऑनलाइन अर्जावर नमूद करावा, शाळांनी प्रवेश नाकारल्यास, अशा तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना राहतील, असे शिक्षण विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.