e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

विरोधकांचा न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न - हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू वर्षामध्ये दोन रस्ते मंजूर झाले असून यातील शेळगाव-निमगाव केतकीचा रस्ता काँग्रेसच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे. मात्र तालुक्यातील विरोधक न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता त्याच्यावर केला.

2019 साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पाटील व भरणे तालुक्यातील विकासकामांचे श्रेयासाठी धडपड करीत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शेळगाव-निमगाव रस्त्याच्या कामासाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राज्यामध्ये भाजप-सेनेची सत्ता असली तरीही इंदापूर तालुक्यामध्ये मात्र रस्त्याच्या कामाच्या श्रेयायाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

शेळगाव (ता.इंदापूर) येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा नुकताच एक कार्यक्रम पार पडला. यावेळी पाटील यांनी सांगितले की, 13 नोव्हेंबर 2017 ला शेळगाव मधील मोहन दुधाळ, शहाजी ननवरे, सुंदर बनसोडे हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शेळगाव-निमगाव केतकी रस्त्याच्या कामासाठी भेटण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. आम्ही चाैघांनी मुंडे यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली.

यानंतर रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले व सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. मात्र विरेाधक या रस्त्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करुन दिशाभूल करीत असल्याचा आरोप पाटील यांनी भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला. यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव, जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, मोहन दुधाळ,पांडुरंग दुधाळ, डाॅ.सोनाली ननवरे, अलका ननवरे, शालन भोंग, उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news opposition credit work harshawardhan patil

Marathi news pune news opposition credit work harshawardhan patil विरोधकांचा न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न - हर्षवर्धन पाटील | eSakal