पुणे : भोरजवळ 3 बिबटे मृतावस्थेत आढळले
नसरापुर (पुणे) : दिवळे (ता. भोर) गावच्या हद्दीत सोमवारी तीन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. बिबट्यांचा मृत्यु विषबाधेने झाल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र बिबटे असल्याचे वन विभागाला ग्रामस्थांनी वारंवार सांगुनही नागरीकांना खोटे पाडणाऱ्या वनविभागाची या प्रकाराने पोल खोल झाली आहे.
दिवळे गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी तीन बिबटे मृतावस्थेत पडल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यात दोन नर आणि एक मादीचा समावेश आहे. ही माहिती ग्रामस्थांनी ताबडतोब वनविभागाला कळवली. त्याबरोबर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मृत बिबट्यांचा पंचनामा केला. या भागात काही कावळेही मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे या बिबट्यांचा मृत्यु विषबाधेने झाला असल्याचा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर बिबट्यांचा मृत्यु नेमका कशाने झाला हे स्पष्ट होईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनविभागाचे दुर्लक्ष
दिवळे गावात बिबट्या दिसल्याचे काही ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी वन विभागाला कळवले होते. मात्र वन विभागातील एका महाशयांनी या ग्रामस्थांनाच पकडून नेण्याची धमकी देत खोटे पाडले. मात्र सोमवारी तीन बिबटे मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.