रस्त्यावर केमिकल सांडल्याने वाहनचालक घसरून पडले
हडपसर (पुणे) : खासगी कंपनीचा केमिकल घेऊन चाललेल्या कंटेनरमधून केमिकल रस्त्यावर सांडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. रविदर्शन सोसायटी ते पंधरा नंबर दरम्यान रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हडपसर पोलिसांनी आग्नीशामक दलाच्या मदतीने रस्ता स्वस्छ केला. दरम्यान या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

केमीकलचा ट्रक सोलापूरच्या दिशेने जात होता. यावेळी त्यातील केमिकलचे बॅरलमधून केमीकलची गळती सुरू झाली. नागरिकांनी चालकाला थांबवले तेव्हा नागरिक मारतील या भीतीने चालकाने गाडी सोडून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने अग्निशामक दलास कळवले. काही वेळातच अग्निशामक दलाचे शिवाजी चव्हाण व त्यांचे सहकारी कर्मचारी दाखल झाले.
केमीकलचा उग्र वास दूरवर पसरला होता. तसेच त्यामुळे नागरिकांची डोळ्यात मोठया प्रमाणात जळजळ होत होती. अखेर नागरिक निलेश सामल, सचिन मोरे, बाळासाहेब शिंदे, भीमा शिंदे यांनी पुण्याकडून लोणीकडे जाणारी वाहतूक बंद केली. व आग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला व रस्ता स्वच्छ केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान हडपसर पोलिसांनी संबधिक ट्रक ताब्यात घेतला असून याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिली.