उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेत इच्छुकांची फौज
सातारा - शिवसेनेने या वेळी स्वबळावर निवडणुका लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवार शिवसेनेकडून दिला जाणार, हे निश्चित आहे. सध्यातरी त्यांच्याकडे उमेदवारांची फौज आहे. त्यातून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कोणाच्या नावाचा आदेश देणार, याची उत्सुकता आहे. सध्यातरी उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, हर्षल कदम, जावळीतील सखाराम पार्टे यांच्यापैकी कोणाच्या नावाचा आदेश मिळणार, याचीच उत्सुकता आहे.

स्वबळावर निवडणुका लढणाऱ्या शिवसेनेकडे साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यास इच्छुकांची फौज आहे. पण, शिवसेनेत पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा आदेश महत्त्वाचा असतो. ते कोणाच्या नावाचा आदेश देणार, तोच उमेदवार अंतिम असणार आहे.
शिवसेनेची ताकद जिल्ह्यात चांगलीच आहे. मागील काही निवडणुकांत शिवसेनेने स्वबळावर यश मिळविलेले आहे. आता लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती नसल्याने धनुष्यबाण चिन्हावर सातारा लोकसभेचा उमेदवार लढणार आहे. शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची इच्छा आहे. आतातर स्वबळामुळे ही इच्छा पूर्ण होणार आहे. सध्यातरी उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, हर्षल कदम, जावळीतील सखाराम पार्टे यांच्यापैकी कोणाच्या नावाचा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे देणार, याचीच उत्सुकता आहे.
शिवसेनेच्या मते खासदार उदयनराजेंनी भूमाता दिंडी काढली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणी व वीज बाहेर जाऊन देणार नाही, वीज भारनियमन होऊ देणार नाही, या मुद्यांवर निवडणूक लढली आणि ते खासदार झाले. पण, या सर्व मुद्यांना ते विसरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेना या मुद्यांच्या अनुषंगाने रान उठविणार आहे. त्यासाठी सध्या बुथ बांधणी, ग्रामीण भागात पक्षाची बांधणी करण्यावर सर्वांनी भर दिला आहे.