e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

'बाबरी'बाबत तडजोड नाहीच; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा खुलासा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नदवींना सल्ला भोवला 
बाबरी मशीद वादग्रस्त जागेवरून इतरत्र हलविण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने कार्यकारी सदस्य सलमान नदवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एकदा बांधलेली मशीद नंतर कोणाला बक्षीस किंवा विकता येत नाही, तसेच ती मूळ जागेवरून हलविताही येत नाही. अशी बोर्डाची ठाम भूमिका असून, अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून नदवी यांनी एकप्रकारे बोर्डाच्या भूमिकेला विरोध केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे सदस्य कासिम इलियास यांनी दिली. 

हैदराबाद : एकदा मशीद बांधला, की ती अनंतकाळापर्यंत मशीदच राहते. अयोध्या वादाविषयी आम्ही घेतलेल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने (एआयएमपीएलबी) स्पष्ट करण्यात आले. 

येथे आयोजित "एआयएमपीएलबी'च्या तीनदिवसीय अधिवेशनाला सुरवात झाली असून, या पार्श्वभूमिवर एआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओवेसी म्हणाले, ""एकदा मशीद उभी राहिली, की ती कायम मशीदच राहते. असे आम्ही बाबरी मशिदीबाबत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यात तडजोड होऊ शकत नाही. जेथे बाबरीचा विषय आहे; त्या संदर्भात तडजोड करणाऱ्यांना अल्लाला उत्तर द्यावे लागेल.'' 

केंद्र सरकारने तोंडी तलाकबाबत आणलेले विधेयक घटना आणि अल्पसंख्यासाठी असलेल्या घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असून, मुस्लिम समुदायाला ते स्वीकार नाही. असे "एआयएमपीएलबी'चे अध्यक्ष मौलाना रबे हस्नी नादवी व सरचिटणीस मौलाना वली रेहमानी यांनी आपल्या भाषणात नमूद केल्याची माहितीही ओवेसी यांनी या वेळी दिली. 

दरम्यान, बोर्डाकडून नुकत्याच जारी केलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात पारदर्शी व समान न्याय यांच्या सचोटीवर अयोध्याप्रकरणी वाटाघाटी करण्यास बोर्ड तयार असल्याचे नमूद होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी बंगळूरमध्ये घेतलेल्या बैठकीत न्यायालयबाह्य तोडगा काढण्यास एआयएमपीएलबी आणि वक्‍फ बोर्डाच्या काही सदस्यांनी संमती दर्शविली होती. 

Web Title: National news Babri Masjid will remain mosque till eternity All India Muslim Personal Law Board

National news Babri Masjid will remain mosque till eternity All India Muslim Personal Law Board 'बाबरी'बाबत तडजोड नाहीच; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा खुलासा | eSakal