मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी जाळ्याचे कवच
मुंबई : मंत्रालयात सातत्याने होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आता मंत्रालय प्रशासनाने जाळ्याचे कवच तयार केले आहे. मंत्रालयात अडचणी घेऊन येणाऱ्या एका तरुणाने नैराश्यातून मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकाराची गंभीर दखल मंत्रालय प्रशासनाने घेतली.

काही दिवसांपूर्वी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडलेल्या ४३ वर्षीय हर्षल रावते या चेंबूर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच अहमदनगरमध्ये राहणाऱ्या अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने कृषी अधिकारीपदाची परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटना लक्षात घेता मंत्रालय प्रशासनाने आत्महत्या रोखण्यासाठी जाळ्याचे कवच तयार केले आहे.