e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
05.17 AM

नागपूर - महानगरपालिकेतून बडतर्फ झालेल्या चार कर्मचाऱ्यांनी नोकरीत पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता बाळगून चारही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सन 1993 मध्ये पालिका प्रशासनाने विविध संवर्गातील पदांसाठी 256 उमेदवारांची भरती केली होती. यातील काहींना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. न्यायालयीन लढाईनंतर अनेकांना सेवेत घेतले. 17 बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत न घेतल्याने ते अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने सुरेश बर्डे, अशोक देवगडे, मो. युसूफ, मो. याकूब, विनायक पेंडके, गणपत बाराहाते आणि दीपक पारोडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज यातील काही जण रामगिरीजवळ पोचले. यातील विजय हटवार नावाच्या कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतले. पोलिसांनी त्याला थांबविल्याने अनर्थ टळला. विजय हटवार, विनायक पेंडके, अशोक देवगडे, मो. याकूब आणि दीपक पारोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर रामगिरी परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण
पालिका प्रशासनाने 1993 मध्ये 256 जणांची भरती केली होती. मात्र भरतीत घोळ झाल्याचा आरोप करीत भालचंद्र जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलायाने ही भरती प्रक्रिया स्थगित केली. 1997 मध्ये भरती प्रक्रियेवरील स्थगिती हटविण्यात आली. सर्व 256 लोकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. सर्व जण रुजू झाले हे आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून देण्यात आले. साडेचार वर्षे या सर्वांनी सेवा दिली. या कर्मचाऱ्यांपैकी 106 कर्मचाऱ्यांना 4 फेब्रुवारी 2002 मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी बडतर्फ केले. यामुळे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन नासुप्र सभापती मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व 106 कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली. परंतु फायदा झाला नाही.

Web Title: nagpur news chief minister home Self combustion

nagpur news chief minister home Self combustion मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न | eSakal