e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

निवासी डॉक्‍टरांमध्ये असंतोष

सकाळ वृत्तसेवा
05.25 AM

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत शिकणाऱ्या निवासी डॉक्‍टरांच्या स्टायपेंडमधून (पाठ्यवृत्ती) मोठ्या प्रमाणावर टीडीएस (उद्गम कर कपात) कापला जात असल्याची तक्रार आहे. त्याबाबतच्या तक्रारींकडे संबंधित दुर्लक्ष करीत असल्याचे या डॉक्‍टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे म्हणणे आहे. संबंधितांच्या दुर्लक्षाविरोधात या रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टर तीन दिवसांपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत.

'मार्ड'चे सचिव डॉ. राजेश कत्रे यांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघात नुकत्यात झालेल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडण्यात आला. पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक, तसेच नायर रुग्णालयात शिकणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना विद्यावेतन देण्यात येते. टीडीएस हा पगारातून कापण्यात येतो. असे असताना या डॉक्‍टरांच्या विद्यावेतनातून टीडीएस कापणे अन्यायकारक आहे, असे डॉ. कत्रे म्हणाले.

टीडीएस कापण्याची पद्धतही अत्यंत वेगळी आहे. एकाच वेळी अनेक महिन्यांचा टीडीएस कापला जातो. त्यामुळे या डॉक्‍टरांच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम होतो, असे या डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.
दर तीन वर्षांनी या डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात येते; मात्र 2015-16 या आर्थिक वर्षानंतरही वाढ झालेली नाही. राज्याच्या इतर भागांतील निवासी डॉक्‍टरांना अनेक वर्षांपासून विद्यावेतन मिळालेले नाही, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

टीडीएस कपातीबाबत आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याचा निर्णय घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन!
न्यायालयाच्या निर्णयानुसार संप किंवा आंदोलन करण्यास बंदी आहे. त्यामुळे काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय निवासी डॉक्‍टरांनी स्वीकारला आहे. मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Web Title: mumbai news residence doctor Dissatisfaction

mumbai news residence doctor Dissatisfaction निवासी डॉक्‍टरांमध्ये असंतोष | eSakal