अकोला जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान
अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. कवठा बहादूरा व निंबा फाटा परिसरातील हरभरा व गहू पिकाचे नुकसान झाले.
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मेघगर्जनेसह गारपीट व अवकाळी पाऊस सुरु आहे.
अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. कवठा बहादूरा व निंबा फाटा परिसरातील हरभरा व गहू पिकाचे नुकसान झाले. तळेगाव बाजार, सौंदळा, हातरुन, सिरसोली,पंचगव्हान, दानापूर, देवरी, हिवरखेड परिसरात गारपीट झाली. काही भागात लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या.
आडगाव येथे पाऊस सुरू झाला आहे. अकोला शहरातही सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या असून, ढगाळ वातावरण आहे.