e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

‘नायलॉन’ मांजावर बंदीसाठी लोकशिक्षणासह जनजागृती हवी

सकाळ वृत्तसेवा
05.09 AM

पशुपक्ष्यांसह मानवी जीवनाला घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोऱ्यांपासून बनवलेला ‘मांजा’ उत्पादन, साठा, विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे. तरीही पतंगासाठी नायलॉन, गट्टू आणि तंगुस मांजा या सांकेतिक नावाने ‘चायनीज’ व भारतीय बनावटीचा मांजा सर्रास विकला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घातक मांजा न वापरण्याबद्दल माहिती देणे, सामूहिक प्रतिज्ञेचा उपक्रम राबविला पाहिजे. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा असली तरी भारतीय दोऱ्याचा वापर करावा. याबाबत डॉ.

पशुपक्ष्यांसह मानवी जीवनाला घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोऱ्यांपासून बनवलेला ‘मांजा’ उत्पादन, साठा, विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे. तरीही पतंगासाठी नायलॉन, गट्टू आणि तंगुस मांजा या सांकेतिक नावाने ‘चायनीज’ व भारतीय बनावटीचा मांजा सर्रास विकला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घातक मांजा न वापरण्याबद्दल माहिती देणे, सामूहिक प्रतिज्ञेचा उपक्रम राबविला पाहिजे. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा असली तरी भारतीय दोऱ्याचा वापर करावा. याबाबत डॉ. कल्याण गंगवाल यांच्याशी यशपाल सोनकांबळे यांनी साधलेला संवाद...

प्रश्‍न - नायलॉन, तंगुस दोऱ्यांपासून बनवलेल्या मांजावर बंदी केव्हा घातली?
एका जनहित याचिकेवर २०१५ मध्ये दिल्ली खंडपीठाने देशातील विविध राज्यांतील काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन मांजामुळे झालेल्या पशू-पक्षी आणि मानवी मृतांची आकडेवारी देत घातक मांजावर पूर्णतः बंदी घातली होती. त्या वेळी सर्व राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. परंतु, गुजरातमध्ये पतंग उडविण्यासाठी मकरसंक्रांत वगळता स्वतंत्र धोरण आखले गेले नाही. गुजरात, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात पतंग उडविले जातात.

प्रश्‍न - मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे?
सरस किंवा खळामध्ये काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन व तंगुस मांजामुळे सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्येच झाले आहेत. त्यानंतर मांजामुळे इजा होऊन तसेच पतंग पकडण्याच्या नादात अपघात होऊन मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये पशू-पक्षी व मनुष्यहानी झाली आहे. मांजामुळे गंभीर जखमी होऊनही बचावलेल्यांना कान, नाक व डोळे गमवावे लागले आहेत.

प्रश्‍न - बंदी घालूनही नायलॉन, तंगुस मांजा विकला जातो. त्याचे दुष्परिणाम कोणते? 
पतंग उडविण्यावर बंदी घाला, असे आमचे म्हणणे नाही. तर एकमेकांचे पतंग कापण्याच्या स्पर्धा आणि ईर्ष्येतून काचेचे लेपण लावणे, नायलॉन तसेच तंगुस मांजा बनविण्याची विकृती जन्माला आली. शहरीकरणामुळे मैदाने, मोकळ्या जागा न उरल्यामुळे घर व इमारतींच्या छतांवरून पतंग उडविण्यास सुरवात झाली. ‘एनजीटी’ने बंदी घालूनही आदेशाची अंमलबजावणी गांभीर्याने केली जात नाही. त्यामुळे पशू-पक्ष्यांसह लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा यात नाहक जीव जात आहे.

प्रश्‍न - पतंगासाठी मांजावापरावर बंदी हवी की सरसकट पतंग उडविण्यावर बंदी हवी?
मकरसंक्रांतीला प्रथा, परंपरा म्हणून पतंग उडविण्यात येते. या आनंदसोहळ्याला नायलॉन मांजामुळे गालबोट लागत आहे. पतंग कापण्याच्या स्पर्धेतून काचेचे लेपण लावण्याची विकृती निर्माण होत आहे. त्यासाठी लोकशिक्षणावर भर दिला पाहिजे. त्यासह विद्यार्थ्यांमध्ये सचित्र दुष्परिणामांची माहिती देणे, त्यांच्याकडून पतंगासाठी नायलॉन मांजा वापरू नये, यासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याचे उपक्रम ‘करुणा फाउंडेशन’च्या माध्यमातून घेतले जात आहेत. नायलॉन मांजावर पूर्णतः बंदी घालण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने उत्पादक, विक्रेत्यांसह खरेदीदारांवर कारवाई केली पाहिजे.

Web Title: pune news nylon manja ban publicity

pune news nylon manja ban publicity ‘नायलॉन’ मांजावर बंदीसाठी लोकशिक्षणासह जनजागृती हवी | eSakal